कशाची लाज? 'या' ६ अभिनेत्रींनी पोस्ट केले 'ब्रेस्ट फिडिंग'चे फोटो | पुढारी

कशाची लाज? 'या' ६ अभिनेत्रींनी पोस्ट केले 'ब्रेस्ट फिडिंग'चे फोटो

पुढारी ऑनलाईन

मातृत्व लाभल्यानंतर स्त्रीचा आनंद गगनात मानत नाही. तिच्या आयुष्यातील आई ही सर्वात मोठी पदवी तिने मिळवलेली असते. बॉलिवूड अदाकारांनीदेखील आई झाल्यानंतर आनंदाची बातमी त्या-त्यावेळी दिलीय. विशेष म्हणजे, या अदाकारांनी बाळाला ‘ब्रेस्ट फिडिंग’ (स्तनपान) करतानाचे विलक्षण क्षण सर्वांसोबत शेअर केले. कशाची लाज? असे म्हणत कशाचीही तमा न बाळगता या अभिनेत्रींनी ‘ब्रेस्ट फिडिंग’चे फोटो शेअर केले.

पाहुया, या सहा अदाकारा कोण आहेत ज्यांनी स्तनपान करतानाचे फोटोज पोस्ट केले होते. मातृत्व लाभल्यानंतर कुठल्याही प्रकारची तमा बाळगायची गरज नाहीये. असे म्हणत आतापर्यंत या अभिनेत्रींनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

नेहा धूपिया

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धूपियाने ब्रेस्ट फीडिंग करत फोटो पोस्ट केलीय. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लीजा हेडन

लीजा हेडनने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या बाळाला जन्म दिलाय. तिनेदेखील आपल्या मुलाला ब्रेस्ट फीड करतानाचा फोटो पोस्ट केलाय.

शिखा सिंह

‘कुमकुम भाग्य’ फेम शिखा सिंहने आपल्या बाळाला ब्रेस्ट फीड करतानाचा एक फोटो शेअर केलाय.

श्वेता साळवे

श्वेता साळवे ही हिप हिप हुर्रे आणि लेफ्ट राइट लेफ्ट यासारख्या शोमध्ये दिसली होती. या अभिनेत्रीने ऑगस्ट २०१९ मध्ये स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला होता.

अमृता राव

बॉलीवूड अभिनेत्री अमृता रावनेदेखील बेबी ब्रेस्ट फीड करतानाचे फोटोज पोस्ट केले होते.

सेलिना जेटली

सेलिना जेटलीनेदेखील ब्रेस्ट फीड करतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

Back to top button