आज (शनिवार) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस उपअधिक्षक कदम, एलसीबीचे पोलीस निरिक्षक बळीराम गीते, ठाणेदार अशोक लांडे आदींसह पोलीसांचे श्वानपथक व फिंगरप्रिंट पथक बँकेत पोहोचले. यावेळी बँकेच्या अधिका-यांनी तिजोरीची पडताळणी केली असता, चोरट्यांनी 20 लाखांची रोकड लंपास केल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळाची पाहणी केली.