राजकीय पार्श्वभूमी असलेले अनेक कलाकार आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीत आहेत. त्यापैकी दोन कलाकार अभिनेत्री आहेत – नेहा शर्मा आणि आयशा शर्मा. (Neha-Aisha) या दोघीही राजकीय घराण्यातून आलेल्या. बिहारच्या पॉलिटिकल फॅमिलीशी संबंधित या दोन्ही अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर नाव कमावलं. नेहा-आयशा शर्मा (Neha-Aisha) या दोघीही राजकीय घराण्यातील असल्या तरीही त्यांनी आपल्या बोल्ड अदांनी सर्वांना घायाळ केलंय. बॉलीवूडमध्ये नेहा आणि आयशा यांनी आपलं बस्तान बसवलं. नेहाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. राजकीय वारसा न चालवता या दोघींनी (Neha-Aisha) थेट अभिनयाचा मार्ग धरला.
बिहारच्या राजकीय घराण्यातील नेहाही काँग्रेस नेते अजीत शर्मा यांची मुलगी आहे. तमिळ चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. तिला काही चित्रपट मिळाले. ग्लॅमरस चेहरा असूनही ती इंडस्ट्रीमध्ये फार काळ टिकली नाही.
नेहा मुळची बिहार-भागलपूर आहे. तिने शालेय शिक्षण माउंट कारमेल स्कूल, भागलपूरमधून घेतले. नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्लीतून फॅशन डिझाईनचे शिक्षण घेतले.
नेहाने २००७ मध्ये तेलुगू चित्रपट 'चिरुथा'तून सुरूवात केली होती. नेहा पहिल्यांदा बॉलीवूड 'किसर' इमरान हाशमी २०१० मध्ये 'क्रुक'मध्ये दिसली होती.
'तेरी मेरी कहानी', क्या सुपर कूल है हम, जयंता भाई की लव्ह स्टोरी, यमला पगला दीवाना, हेरा फेरी ३ सह अन्य चित्रपटात ती दिसली.
नेहाचे वडील अजीत शर्मा बिहारचे काँग्रेस नेते आहेत. अजीत शर्मा यांनी काँग्रेसचे तिकिट घेऊन विधानसभेत पोहोचले होते. निवडणुकांवेळी नेहा आपल्या वडिलांसोबत प्रचार करताना दिसतेय.
नेहाने 'बिग बॉस-१३' चा विजेता दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये पाहण्यात आलं होतं. तिने अजय देवगनचा सुपरहिट चित्रपट 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'मध्ये कमला देवीची भूमिका साकारली होती.
नेहा कथ्थक करते. तिने लंडनच्या पायनएप्ल डान्स स्टुडिओजमधून विविध विधिध डान्स फॉर्म्समध्ये ट्रेनिंग घेतलं आहे. नेहा सोशल मीडियावर देखील ॲक्टिव असते. आपले बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज ती पोस्ट करत असते.
नेहा शर्माला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. नेहाच्या दोन्ही बहिणी तिच्याप्रमाणेच ग्लॅमरस आहेत.
आयशा शर्मा देखील अभिनेत्री आहे. आयशाने 'सत्यमेव जयते' मध्ये जॉन अब्राहमसोबत काम केलं. सौंदर्यात आयशादेखील मोठी बहिण नेहाला टक्कर देते. पण, तिला चांगले चित्रपट मिळूनदेखील तिने तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.