firecrackers : फटाके फोडताना शाळकरी मुलाचा डोळा झाला निकामी! - पुढारी

firecrackers : फटाके फोडताना शाळकरी मुलाचा डोळा झाला निकामी!

जालना; पुढारी वृत्तसेवा :

फटाके हे  दिवाळी सणाचा आनंद व्‍दिगुणीत करतात. मात्र फटाके फोडताना काळजी घेतली नाही तर त्‍याचे गंभीर परिणामही हाेतात. अशीच वेदनादायक घटना औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे घडली. येथील नऊ वर्षीय शाळकरी मुलाचा फटाके फोडताना डोळा निकामी झाला आहे. साईनाथ घुगे असे त्‍याचे नाव आहे.

साईनाथ घुगे हा फटाके उडवत हाेता. या वेळी ताे जखमी झाला.  प्रथम उपचारासाठी त्याला नांदेड येथे नेण्यात आले. (firecrackers) तेथून हैदराबाद येथे उपचारासाठी नेण्यात आले. फटाका डोळ्यावर उडून (firecrackers) आल्यामुळे साईनाथ याचा उजवा डोळा निकामी झाला, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. आपल्या मुलांकडे फटाके देताना पालकांनी  विशेष काळजी घेण्याचे आवाहन महसूल, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

हेही वाचलं का?

Back to top button