Gautam-Soundarya romance : सौंदर्या-गौतमचा बिग बॉसमध्ये खुलेआम रोमान्स, कधी किस तर कधी…

gautam-soundarya
gautam-soundarya
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्ये घरात रोज काही ना काही घडत असतं. (Gautam-Soundarya romance) वेगवेगळे अपडेट्‌ समोर येत असतानाचं आता घरात रोमान्सची चर्चा चांगलीच रंगलीय. सौंदर्या आणि गौतम वfज दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसताहेत. त्यांना इतकंही भान नाहीये की, घरामध्ये कॅमेरे असून इतरही कंटेस्टंट आजुबाजूला उपस्थित आहेत. (Gautam-Soundarya romance)

'बिग बॉस 16' मध्ये स्पर्धकांमध्ये खूप ड्रामा पाहायला मिळत आहे. घरात रोज काही ना काही भांडण होत असते. त्यामुळे शोचे वातावरणही तापत असते, पण या सगळ्यात सौंदर्या शर्मा आणि गौतम विज यांचे प्रेमही वाढत आहे. यापूर्वी, सौंदर्या आणि गौतम विज यांच्यात एक हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता, त्यानंतर असे दिसते की त्यांचे प्रेमसंबंध सुरू होण्यापूर्वीच रुळावरून घसरले होते. पण आता 'बिग बॉस'चा नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही खूपच रोमँटिक दिसत आहेत.

'बिग बॉस १६' च्या निर्मात्यांनी आगामी भागाचा एक प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये सौंदर्या आणि गौतम त्यांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत. त्याचवेळी अब्दू रोजिक या दोघांना पाहून जोरजोरात हसतोय. व्हिडिओमध्ये सौंदर्या गौतमच्या मांडीवर बसून लाजत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान दोघेही एकमेकांना किस करतात. त्याचवेळी अब्दू आणि शिव ठाकरे दुसऱ्या खोलीत बसले आहेत आणि दोघेही काचेतून सौंदर्या-गौतमला पाहत आहेत. त्या दोघांना बघून आधी अब्दू हसताना दिसला.

या प्रोमोची गंमत अशी आहे की, अब्दू शिवासोबत तेच करण्याचा प्रयत्न करतो जे सौंदर्या आणि गौतम करत आहेत. शिव अब्दूला आपल्या मांडीवर बसवतो आणि मग अब्दू थोडा डगमगायला लागतो. 'बिग बॉस'चा हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर चाहतेही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी सौंदर्या आणि गौतमच्या नात्याला खोटे ठरवले आहे.

'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने सौंदर्याला गौतम विजचा खरा चेहरा दाखवला होता. त्याने सौंदर्याला सांगितले की, तू ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहेस, तो खूप काही तुझ्याबद्दल सांगतो आहे. त्यानंतर सलमान खानने सौंदर्याला एक व्हिडिओ क्लिप दाखवली होती. ज्यामध्ये गौतम विज त्याची मैत्रीण शालीन भानोतसोबत बसला होता आणि तिच्यासोबत निमृत कौर अहलुवालियाही होती. त्यादरम्यान शालीन आणि निम्रत सौंदर्याची चेष्टा करताना दिसले आणि गौतम यावर काहीही न बोलता उलट हसताना दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news