Electric Tractor : पंजाबमधील विद्यापीठाने बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

Electric Tractor : शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी.. या विद्यापीठाने बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
Electric Tractor : शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी.. या विद्यापीठाने बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Electric Tractor) देशात इंधानाचे दर गगनाला भिडले आहेत. डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा वापरासाठी अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत. शेतकऱ्यांना उत्पन्नातून मिळालेले सर्वाधिक पेसै इंधनावर खर्च करावे लागतात; पण यावर पंजाबच्या एका विद्यापीठाने पर्याय काढला आहे. या विद्यापीठाs[y इंजिनिअरिंगच्या विभागाने इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे.

हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) डिझेल इंजिनाइतकाच कार्यक्षम आहे. इंधनदर वाढीमुळे शेतकऱ्यांना हाेणार्‍या आर्थिक नुकसानीचा विचार करुन  चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाने हे मॉडेल विकसित केले आहे. देशातील विद्यापीठातील ई-ट्रॅक्टरवरील हे संशोधन पहिले संशोधन आहे. हे संशोधन प्रोफेसर डॉ. मुकेश जैन, शास्त्रज्ञ आणि संचालक, फार्म मशिनरी आणि पॉवर इंजिनिअरिंग विभाग यांच्या देखरेखीखाली कार्यान्वित करण्यात आला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी या प्रोजेक्टची सुरुवात झाली होती.

 ट्रॅक्टरसंदर्भात माहिती देताना प्रोफेसर डॉ. मुकेश जैन सांगतात, "सध्या देशात सुमारे ८० लाख ट्रॅक्टर आहेत. ३० हॉर्स पावर पेक्षा कमी क्षमतेचे ट्रॅक्टर दरवर्षी सुमारे ४.६ दशलक्ष टन कार्बन-डायऑक्साइड वायू उत्सर्जित करतात. बॅटरीवर चालणारे ट्रॅक्टर डिझेल इंजिनला बदलले तर प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते."(Electric Tractor)

"देशातील शेतीसाठी सरासरी वीज उपलब्धता प्रति हेक्टर २.५ kWh आहे, तर विकसित देशांमध्ये ही आकडेवारी सुमारे १५ kWh आहे. या मोठ्या अंतरामुळे यांत्रिकीकरणाला भरपूर वाव आहे, असेही ते म्हणाले.

ट्रॅक्टरची बॅटरी ९ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते

 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर १६.२ kWh क्षमतेच्या लिथियम आयन बॅटरीने चालतो. यात १२ kW ची इलेक्ट्रिक ब्रशलेस DC मोटर आहे, जी ७२ V वर चालते. ट्रॅक्टरची बॅटरी ९ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.

बॅटरी चार्ज करण्यासाठी १९ ते २० युनिट वीज लागते. यात जलद चार्जिंगचा पर्याय देखील आहे. ज्यासाठी फक्त ४ तास पुरेसे आहेत.(Electric Tractor) एकदा चार्ज केल्यानंतर ८० किमी पर्यंत जाऊ शकतो. एकदा चार्ज केल्यानंतर, हा ई-ट्रॅक्टर १.५ टन ट्रेलरसह ८० किमी पर्यंत जाऊ शकतो. या ट्रॅक्टरचा कमाल वेग २३.१७ कि.मी. प्रतितास आहे. यात ड्रॉबार पुल म्हणजेच पुल आणि फॉरवर्ड पॉवर ७७ टक्के आहे, म्हणजेच हा ट्रॅक्टर ७७० किलो वजन उचलण्यास सक्षम आहे.

खर्च किती येतो?

नांगरण्यासाठी रोटाव्हेटर आणि मोल्ड बोर्डसह अनुक्रमे ३३२ रुपये आणि ३०१ रुपये प्रति तास खर्च येतो. जर एवढेच डिझेल इंजिनच्या ट्रॅक्टरने नांगरले तर त्याची किंमत ४४७ रुपये आणि ३५३ रुपये आहे. अशा प्रकारे डिझेलच्या तुलनेत प्रति तास १५ ते २५% पैशांची बचत होऊ शकते. हे सर्व खर्च घरगुती वीज दराच्या आधारावर मोजले आहेत.

सध्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात आला नसून, फक्त त्याचा प्रोटोटाइप तयार करण्यात आले आहे; पण हा ट्रॅक्‍टर लवकरच बाजारात आणणार असल्याचे डॉ.जैन यांनी सांगितले. "प्रोटोटाइप मॉडेल असल्याने या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत सध्या सुमारे ६.५ लाख रुपये असल्‍याची त्‍यांनी म्‍हटलं आहे. (Electric Tractor)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news