Jacqueline and Nora : अभिनेत्री जॅकलिन आणि नोरावर ‘ईडी’ अधिकार्‍याने टाकला दबाब, नातेवाईकांसमवेत फोटो काढले, दोन तरुणींना ‘फॉलो’ करायला लावले!

Jacqueline and Nora : अभिनेत्री जॅकलिन आणि नोरावर ‘ईडी’ अधिकार्‍याने टाकला दबाब, नातेवाईकांसमवेत फोटो काढले, दोन तरुणींना ‘फॉलो’ करायला लावले!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
२०० कोटी रुपयांच्‍या मनी लॉड्रिंग प्रकरणाची चौकशी करताना अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही ( Jacqueline and Nora ) यांच्‍यावर 'ईडी'चा अधिकार्‍याने दवाब आणला, असा गंभीर आरोप वकिलांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एका वेबसाईटने दिले आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणी सुकेश चंद्रशेखर याला अटक करण्‍यात आली. त्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार याप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोघींचीही 'ईडी'ने चौकशी केली. या चौकशीवेळी 'ईडी'चे अधिकारी राहुल वर्मा यांनी पदाचा गैरवापर केल्‍याचा गंभीर आरोप जॅनलिक आणि नोरा यांच्‍या वकील विक्रम चौहान यांनी केली आहे.

Jacqueline and Nora : नातेवाईकांसमवेत फोटो काढा, इंस्‍टावर फॉलो करा…

राहुल वर्मा यांनी जॅनलिन आणि नोरा यांच्‍यावर चौकशीवेळी नातेवाईकांबरोबर फोटो करण्‍यासाठी दबाव टाकला. तसेच वर्मा यांनी आपल्‍या परिचयाच्‍या दोन तरुणींचे इंस्‍टाग्राम अकाउंट फॉलो करण्‍यास जॅकलिनला सांगितले. चौकशीवेळीच जॅकलिन हिने या राहुल वर्मा याच्‍या नातेवाईक असणार्‍या दोन मुलींना फॉलो केले, असा आरोप वकील विक्रम चौहान यांनी केला आहे. विशेष म्‍हणजे, वर्मा यांच्‍या नातेवाईक असणार्‍या या दोन तरुणी ईडी कार्यालयात उपस्‍थित होत्‍या. मोनिका पांडे आणि अनामिका पांडे अशी त्‍यांची नावे असल्‍याचेही वकिलांनी म्‍हटलं आहे.या दोघीनींही आता तक्ररीनंतर अकाउंट अनफॉलो केले आहे, असेही चौहान यांनी म्‍हटले आहे.

चौहान यांनी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री आणि ईडीला टॅग करत ही तक्रारी ट्‍विट केली आहे. जॅनलिन आणि नोरा यांच्‍यासोबत झालेला प्रकारावर वारंवार कारवाईची मागणी आम्‍ही केली आहे. आपल्‍या पदाचा दुरुपयोग करणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणीही त्‍यांनी केली आहे.

अशा प्रकारे चौकशीवेळी दबाव कायदाचा भंग आहे. देशातील कोणतीही चौकशी यंत्रणा अशा प्रकारे काम करु शकत नाही. तसेच या तक्रारीचे चौकशी व्‍हावी, जॅकलिन हिने कोणाला फॉलो केले याची माहिती मिळू शकते, यावरुन तक्रारीत तथ्‍य आहे का, हेही स्‍पष्‍ट होईल, असे आयटी क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी म्‍हटले आहे.

जॅनलिनबरोबर रिलेशनशिपमध्‍ये होतो : सुकेश

मनी लाँड्रिंगप्रकरणी सुकेश सध्‍या न्‍यायालयीन कोठडीत आहे. त्‍याने आपले वकील अनंत मलिक यांना कारागृहातून एक पत्र लिहिले आहे. हे पत्र मलिक यांनी माध्‍यमांना दिले होते. त्‍यात म्‍हटले होते की, माझ्‍यावर ठेवण्‍यात आलेल्‍या सर्व आरोपांशी जॅनलिन व अन्‍य बॉलीवूडच्‍या अभिनेत्रींचा कोणाताही संबंध नाही. बॉलीवूडमधील एका मित्रानेच मला टार्गेट केले. बॉलीवूडमध्‍ये मी चित्रपट करु नये यासाठीच त्‍यानेच माझ्‍या बदनामीचे कारस्‍थान रचले. माझ्‍यावर करण्‍यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही, असा दावाही त्‍याने या पत्रातून केला आहे.

सुकेशने जॅकलिनला दिल्‍या होत्‍या १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या भेटवस्तू

'ईडी'च्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सुकेश याने जॅकलिन फर्नांडिसला १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये विविध प्रकारची आभुषणे, हिरेजडीत दागिने, क्रॉकरी, चार फ्रेंच जातीची मांजरे (एका मांजराची किंमत अंदाजे एक लाख रूपये) आणि ५२ लाख रूपये किंमतीचा एक घोडा पण आहे. त्याचबरोबर सुकेशने जॅकलीनचा भाऊ आणि बहिणीलाही मोठी रक्कम पाठवली होती. त्यानंतर 'ईडी'ने जॅकलिनच्या जवळचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती.त्याचबरोबर सुकेशने नोरा फतेहीलाही बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन भेट दिला होता. त्याची एकूण किंमत एक कोटींहून अधिक होती. तिहार तुरुंगातून 200 कोटी वसूल केल्याप्रकरणी मनी लाँड्रिंग अंतर्गत दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news