पुढारी ऑनलाईन डेस्क
कुरुप या मल्याळम चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. कुरूप ओटीटीवर १७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. या चित्रपटाचा हिरो दलकिर सलमानसोबतचं चर्चा होत आहे ती म्हणजे शोभिता धूलिपाला हिची. शोभिता धुलिपाला दिसायसा इतकी सुंदर आहे की तुम्ही तिला पाहतचं राहाल. कुरुप चित्रपटात शोभिता धूलिपाला हिचाचं बोलबाला पाहायला मिळत आहे.
शोभिता एक मॉडल आणि अभिनेत्री आहे. तिला फेमिना मिस इंडिया २०१३ मध्ये दुसरे स्थान मिळाले होते. मिस अर्थ २०१३ मध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
शोभिताने अभिनयाची सुरुवात अनुराग कश्यपच्या रमन राघव २.० (२०१६) तून केली होती. पुढे तिने तेलुगू चित्रपट गूडचारी (२०१८) आणि ॲमेझॉन व्हिडिओ ड्रामा सीरीज मेड इन हेवन (२०१९) मध्ये काम केले होते.
शोभिताचा जन्म तेनाली, आंध्र प्रदेशमध्ये ३१ मे १९९२ रोजी झाला होता. तिचे बालपण विशाखपट्टणममध्ये गेले. तिचे शालेय शिक्षण लिटिल एंजल्समध्ये पूर्ण झाले. चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली. मुंबई युनिव्हर्सिटीच्या एच. आर. कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्समध्ये पुढचे शिक्षण घेण्यासाठी ती मुंबईत आली.
ती उत्कृष्ट भरतनाट्यम आणि कुचिपुडीमध्ये प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगनादेखील आहे.
रमन राघव २.०, शेफ, कालाकांडी, गूडचारी, मूथोन, द बॉडी, घोस्ट स्टोरीज या चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. अक्षत वर्मा दिग्दर्शित कालकांडी, राजा मेनन दिग्दर्शित चित्रपट शेफमध्ये तिच्यासोबत सैफ अली खान होता. या चित्रपटातून तिने आपला अदाकारी, अभिनयाची चुणूक दाखवली.
हा चित्रपट थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार होता. पण, नंतर निर्णय घेण्यात आला की, हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात येईल. त्यानुसार, या चित्रपटाचा मुख्य अभिनेता दलकीर सलमानने हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज केला. या सुपरहिट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली. ८० कोटीपेक्षा जास्त कमाई कुरुपने केली आहे.
आता कुरूप १७ डिसेंबर रोजी ओटीटीवर रिलीज करण्यात येईल. नेटफ्लिक्सने या चित्रपटाविषयी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर केली आहे. हा चित्रपट हिंदीमध्येदेखील रिलीज करण्यात येईल.
सुकुमार कुरूप नावाचा एक गुन्हेगार होता. त्याच्यावर आधारित या चित्रपटाची कहाणी आहे. सुकुमार कुरूप अद्यापपर्यंत वॉन्टेड आहे, तो पकडला गेलेला नाही.