कॅप्सूल दोन वेगवेगळ्या रंगांची का असतात? | पुढारी

कॅप्सूल दोन वेगवेगळ्या रंगांची का असतात?

नवी दिल्ली : कधी कधी आपण नेहमी ज्या गोष्टी पाहत असतो त्या ‘तशाच’ का असतात हे आपल्याला माहितीही नसते. औषधांच्या कॅप्सूल सर्वांनीच कधी ना कधी आजारपणात गिळंकृत केलेल्या असतात. मात्र, या कॅप्सूल दोन वेगवेगळ्या रंगांच्या का असतात याची अनेकांना माहिती नसेल!

बहुतांश वेळी कॅप्सूल दोन वेगवेगळ्या रंगांची असते. अर्थात एका रंगाचीही कॅप्सूल असू शकते; पण दोन वेगवेगळे रंग ठेवण्यामागे तसेच कारणही आहे. कॅप्सूलचे दोन भाग असतात. एक भाग कॅपचा म्हणजेच टोपणाचा आणि दुसरा भाग कंटेनरचा म्हणजेच ज्यामध्ये औषध भरायचे असते त्याचा. कॅप्सूलच्या या कंटेनरमध्ये औषध भरल्यावर कॅपने ते बंद केले जाते. कॅप्सूल उघडून पाहिली तर एका भागात हे औषध दिसेल आणि एक भाग रिकामा दिसेल. या कॅप आणि कंटेनरचा रंग वेगवेगळा ठेवला जातो.

कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा याबाबत गोंधळ होऊ नये यासाठी असा उपाय केला जातो.  कॅप कोणती आणि कंटेनर कोणते हे चटकन लक्षात यावे म्हणून ही सोय केलेली असते. कॅप आणि कंटेनर वेगवेगळ्या रंगांची बनवण्यासाठी कंपन्यांना अधिक पैसेही मोजावे लागतात! औषधांची कॅप्सूल जिलेटिन आणि सेल्युलोजपासून बनवली जाते. काही देशांमध्ये जिलेटिनपासून कॅप्सूल बनवण्यावर बंदी आहे. भारतातही जिलेटिनऐवजी सेल्युलोजपासून कॅप्सूल बनवण्याचे सरकारी आदेशत.

Back to top button