Penguin New Colony : पेंग्विनच्या नव्या ‘कॉलनी’चा शोध!

Penguin New Colony
Penguin New Colony

न्यूयॉर्क : पश्चिम अंटार्क्टिकामध्ये यापूर्वी कधीही पाहिली न गेलेली पेंग्विनची (Penguin New Colony) एक नवी 'कॉलनी' म्हणजेच प्रजननासाठी बनलेली सामूहिक वसाहत दिसून आली आहे. सॅटेलाईट फोटोंमुळे ही वसाहत अपघातानेच दिसून आली. आतापर्यंत अंटार्क्टिकामध्ये 66 पेंग्विन वसाहती दिसून आलेल्या आहेत.

या कॉलनीमध्ये (Penguin New Colony) सुमारे एक हजार प्रौढ पक्षी असावेत असा अंदाज आहे. याठिकाणी पेंग्विनच्या 500 जोड्या आणि त्यांची पिल्ली असावीत असाही अंदाज आहे. त्यामुळे ही एम्परर पेंग्विन प्रजातीमधील तुलनेने लहान आकाराची कॉलनी ठरते. ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हे (बास) चे जियोग्राफिक इन्फॉर्मेशन ऑफिसर पीटर फ्रेटवेल यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या कॉलनीचा शोध लावला.

आता 20 जानेवारीला म्हणजेच 'पेंग्विन अवेअरनेस डे'च्या (पेंग्विन जागृती दिन) निमित्ताने या शोधाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. फ्रेटवेल यांनी सांगितले की युरोपियन स्पेस एजन्सीच्या दोन 'कोपरनिकस सेंटीनेल-2' उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे ते समुद्रातील वितळलेल्या बर्फाची माहिती घेण्यासाठी पाहत असताना या कॉलनीचा (Penguin New Colony) अपघातानेच शोध लागला. बर्फावर अगदी छोटा तपकिरी रंगाचा ठिपका असावा असे आधी दिसले. हा ठिपका म्हणजेच ही पेंग्विन कॉलनी होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news