Gold prices | ३ महिन्यांत सोने ६ हजारांनी महागले, जाणून घ्या नवे दर

Gold prices | ३ महिन्यांत सोने ६ हजारांनी महागले, जाणून घ्या नवे दर

Gold prices : आर्थिक मंदीची वाढती चिंता आणि डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. त्यात लग्नसराई सुरु असल्याने सोन्याला मागणी वाढली आहे. परिणामी सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर ५७ हजार पार झाला आहे. सोन्याच्या दरात ३८० रुपयांची तेजी आली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५७,११० रुपयांवर पोहोचला आहे. हा सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक आहे. तर चांदीच्या दरात २०० रुपयांची वाढ होऊन दर प्रति किलो ७२,१०० रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरपासून तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सोने ६ हजार रुपयांनी महागले आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, २२ कॅरेट सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत आज ३५० रुपयांची वाढ झाली. यामुळे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५२,३५० रुपये झाला आहे. मुंबई, कोलकाता, हैदराबाद येथे २४ आणि २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर अनुक्रमे ५७,११० रुपये आणि ५२,३५० रुपये आहे.

दिल्लीत २४ आणि २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर अनुक्रमे ५७,२७० रुपये आणि ५२,५०० रुपये आहे. चेन्नईत २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५८,०९० रुपये आणि ५३,२५० रुपये आहे. तर दिल्ली, मुंबई आणि कोलकातामध्ये प्रति किलो चांदीचा दर ७२,१०० रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नई आणि हैदराबादमध्ये चांदी प्रति किलो अनुक्रमे ७४,५०० रुपये आणि ७२,१०० रुपयांना विकली जात आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२१) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५७,०५० रुपयांवर जाऊन बंद झाला होता. तर २३ कॅरेट ५६,८२२ रुपये, २२ कॅरेट ५२,२५८ रुपये, १८ कॅरेट ४२,७८८ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३३,३७४ रुपयांवर जाऊन बंद झाला होता.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते. (Gold prices)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news