मांजर मारल्याचा शेजाऱ्यावर संशय; अन् बदला म्हणून ३० कबुतरांना विषारी दाने टाकून मारले | पुढारी

मांजर मारल्याचा शेजाऱ्यावर संशय; अन् बदला म्हणून ३० कबुतरांना विषारी दाने टाकून मारले

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर जिल्ह्यात एक अनोखी घटना उघडकीस आली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाने आपल्या मांजरीला मारल्याच्या संशयातून शेजाऱ्याने पाळलेल्या ३० कबुतरांना विषारी दाने देऊन मारले. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (शहर) संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे सदर बाजार भागात राहणारा वारिस अली हा पक्षीप्रेमी असून त्याने ७८ कबुतरांचे पालनपोषण केले होते. वारिस अलीचा शेजारी आबिदने त्याच्यावर पाळीव मांजरीला मारल्याचा आरोप केला होता. परंतु त्याने पाळलेली मांजर नंतर परत आली. यानंतर कबुतरांच्या मृत्यूची बाब समोर आली. वारिस अलीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेजारी आबिदने 17 जानेवारी रोजी कबुतराच्या दान्यांमध्ये विष मिसळून त्यांच्या कबुतरांना दिले. ज्यामुळे 30 कबुतरांचा मृत्यू झाला आणि 35 हून अधिक कबूतर आजारी पडले. आजारी कबुतरांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी वारिस अलीने दिलेल्या फिर्यादीवरून आबिद, रुखसार बानो आणि मना बानो यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. तसेच मृत कबुतरांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असल्याचे कुमार यांनी सांगितले.

Back to top button