Devmanus : वाटलं नव्हतं की, देवमाणूस करताना असंही शूट करावं लागेल

kiran gaikwad
kiran gaikwad

पुढारी ऑनलाईन

देवमाणूस (Devmanus) या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. मालिकेच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या मालिकेचं दुसरं पर्व अल्पावधीतच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या पर्वाने देखील प्रेक्षकांना पहिल्या भागापासूनच टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. Devmanus मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे.

मालिकेत डॉक्टरला नीलमच्या रूपात नवीन सावज मिळालं आहे. डॉक्टरला नवीन सावज मिळाल्यावर त्यांच्या सोबत काय होतं याचा अंदाज प्रेक्षकांना तर आहेच. पण नवीन नवीन ट्विस्ट दाखवून ह[ मालिका प्रेक्षकांना थक्क करते. तसेच किरण गायकवाडचा सहज अभिनय या मालिकेतील देवमाणसाचा प्रभाव प्रेक्षकांवर कायम ठेवते; पण नुकतंच मालिकेतील एक प्रसंग शूट किरणला धक्का बसला.

त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हंटल आहे, "वाटल नव्हत की देवमाणूस शूट करताना असा काही सिक्वेन्स शूट करावा लागेल". या मालिकेतील अनेक प्रसंग हे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देतात; पण असा कुठला प्रसंग किरणने चित्रित केला ज्यामुळे त्याला धक्का बसला आहे.

चाहते आणि रसिक प्रेक्षह हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असून त्याबद्दल अनेक तर्कवितर्क नेटिझन्स त्या पोस्टच्या कॉमेंट सेक्शनमध्ये लावत आहेत. पण कदाचित त्यांना याचं उत्तर मालिका पाहताना आगामी भागात मिळेल. आता ही मालिका आणखी कुठल्या रंजक वळणावर जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पाहा देवमाणूस २ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता  झी मराठीवर.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news