सातारा : खोडशी येथे बिबट्याचा बछडा सापडला | पुढारी

सातारा : खोडशी येथे बिबट्याचा बछडा सापडला

कराड : पुढारी वृत्तसेवा;  कराड तालुक्यातील तिरपे आणि येणके या दोन गावात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याच्या घटना ताजा असतानाच तालुक्यातील खोडशी येथे बिबट्याचा सुमारे एक वर्षाचा बछडा तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकल्याने वनविभागाच्या हाती लागला. वनविभागाने त्या बछड्याला सुरक्षितस्थळी हलविले असून याच परिसरात आणखी एका मादी बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

खोडशी गावच्या हद्दीत कृष्णा नदीकाठी असलेल्या मळीत तारेचे कंपाऊड आहे. याच कंपाऊंडमध्ये एक बिबट्या अडकल्याचे मंगळवारी (दि.८) रोजी सकाळी बापूराव पाटील या शेतकऱ्याला दिसले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील आणि वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित बिबट्याला तेथून सुरक्षितस्थळी हलविले आहे. (बिबट्या जेरबंद )

दरम्यान याच परिसरात मादी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळेच मादी बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी वहागाव आणि वनवासमाची परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते. यापूर्वी एका बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा खोडशीत बिबट्याचा वावर आढळून आल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button