‘तुझसे नाराज़ नहीं हैरान हू मैं’… पंतप्रधानांच्‍या महाराष्‍ट्रावरील आरोपावर खासदार सुप्रिया सुळे व्‍यथित | पुढारी

'तुझसे नाराज़ नहीं हैरान हू मैं'... पंतप्रधानांच्‍या महाराष्‍ट्रावरील आरोपावर खासदार सुप्रिया सुळे व्‍यथित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महाराष्‍ट्र काँग्रेसमुळेच कोरोना पसरल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. पंतप्रधानांच्‍या विधानामुळे महाराष्‍ट्राची बदनामी झाली आहे. या विधानावर एवढचं म्‍हणावासं वाटतं की, ‘तुझसे नाराज़ नहीं हैरान हू मैं’, अशा शब्‍दांमध्‍ये राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विधानावर नाराजी व्‍यक्‍त केली.

माध्‍यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या की, महाराष्‍ट्र काँग्रेसमुळेच कोरोनाची पहिली लाट पसरली, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे. महाराष्‍ट्राबद्‍दल पंतप्रधान बोलले ते अत्‍यंत वेदनादायी आहे. ज्‍या राज्‍यांनी भाजपचे १८ खासदार निवडून दिले. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍यात महाराष्‍ट्रातील जनतेचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात. त्‍यामुळे त्‍यांनी केलेले विधान हे महाराष्‍ट्रसाठी दुर्दैवी असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

महाराष्‍ट्रातून परप्रांतीयांना त्‍यांच्‍या स्‍वगृही श्रमिक ट्रेनने पाठविण्‍यात आले. याचा निर्णय केंद्र सरकारनेच घेतला होता. महाराष्‍ट्राला किती श्रमिक ट्रेन पाहिजेत? हे रेल्‍वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्‍यमंत्री उ्‍दधव ठाकरे यांना टिवटरच्‍या माध्‍यमातून विचारले होते. या निर्णयामध्‍ये महाराष्‍ट्राचा संबंध देतोच कुठे? रेल्‍वे संदर्भातील सर्व निर्णय हे केंद्र सरकारच घेते. श्रमिक ट्रेन सोडण्‍याची जबाबदारी ही केंद्र सरकारची होती.

यावेळी श्रमिक ट्रेन साेडल्‍याबद्‍दल देवेंद्र फडणवीस यांनीही रेल्‍वे मंत्री गाेयल यांचे आभार मानल्‍याचे टिवटही केल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. कोरोना नेमका कोणी पसरवला. याच्‍या आत्‍मरिक्षण करावे, असे आवाहनही त्‍यांनी केली. भाजपमधील आमदारांनीही महाराष्‍ट्राच्‍या अपमानाबद्‍दल विचारणा करावी, असे आवाहनही त्‍यांनी केले.

महाराष्‍ट्रामुळे देशात कोरोना पसरला या विधानाला शास्‍त्रीय आधार काय, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. पंतप्रधान राज्‍यांराज्‍यांमधील मतभेद का निर्णाण करत आहेत, असा सवाल करत महाराष्‍ट्रातील सर्वात मोठे प्रकल्‍प बाहेर येणे सुरु आहे, असा आरोपही सुळे यांनी केला. महाराष्‍ट्र कधीच दिल्‍लीच्‍या तख्‍तापुढे झुकलेले नाही, असेही त्‍यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

 

 

Back to top button