दिल्ली ॲसिड प्रकरणी कंगनाचा तीव्र संताप; ‘माझ्या बहिणीच्या ५२ सर्जरी झाल्या’

kangana ranaut
kangana ranaut

पुढारी ऑनलाईन डेस्क :  दिल्लीतील द्वारका परिसरात एका १७ वर्षीय मुलीवर अॅसिड फेकण्यात आलं होतं. या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तीव्र निषेध केला आहे. तिने सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिलीय. तिने तिची बहिण रंगोलीसोबत घडलेल्या एका दुर्देवी घटनेबद्दल सांगितले आहे.

… या घटनेने मीही घाबरले होते

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'मी लहान असताना माझी बहीण रंगोली चंदेलवर रोडसाईड रोमिओने ॲसिड हल्ला केला होता. त्यामुळे तिच्यावर ५२ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यावेळी तिचा मानसिक आणि शारीरिक आघाताचा अंदाज कोणीही लावू शकत नव्हतं. आम्ही एक कुटुंब म्हणून विभक्त झालो. मलाही थेरपीतून जावे लागले कारण मला भीती होती की तेथून जाणारे कोणी माझ्यावर ॲसिड फेकतील.

कंगनाने पुढे लिहिले की, 'हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा बाईकस्वार किंवा कारमध्ये बसलेली व्यक्ती माझ्या जवळून जात असे, तेव्हा मी माझा चेहरा झाकून घ्यायचे. हा अत्याचार अजूनही थांबलेला नाही. सरकारने या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. मी गौतम गंभीरशी सहमत आहे. ॲसिड फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

ॲसिड हल्ल्यात रंगोली थर्ड डिग्री बर्न झाली

कंगना रणौतची बहीण रंगोली चंदेल हिच्यावर ॲसिड हल्ला झाला होता. हल्ल्याच्या वेळी ती २१ वर्षांची होती आणि ती थर्ड डिग्री भाजली होती. एका मुलाखतीत कंगनाने खुलासा केला होता की, त्यावेळी रंगोलीचा अर्धा चेहरा जळाला होता, तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती, एक कान वितळला होता.  रंगोली आता विवाहित आहे आणि तिला ५ वर्षांचा मुलगा आहे. ती अनेकदा कंगनासोबत इव्हेंट्स आणि स्क्रिनिंगमध्ये दिसत असते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news