Cheteshwar Pujara : पुजारचा कहर! 60 चौकार, 11 षटकार ठोकून फटकावल्या 600 धावा

Cheteshwar Pujara : पुजारचा कहर! 60 चौकार, 11 षटकार ठोकून फटकावल्या 600 धावा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या रॉयल लंडन वन डे चषक 2022 मध्ये लिस्ट-ए स्पर्धेत ससेक्सकडून खेळताना त्याने चमकदार खेळाचे प्रदर्शन केले आहे. मंगळवारी त्याने मिडलसेक्सविरुद्ध 75 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकार ठोकत शतकी खेळी साकारली. 90 चेंडूत 132 धावा करून तो बाद झाला.

या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 8 सामन्यात 614 धावा फटकावल्या आहेत. यात 3 शतकांचा समावेश आहे. त्याने या स्पर्धेतील 8 डावात 102.33 च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत ज्यात 3 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 60 चौकार आणि 11 षटकार मारले आहेत. यादरम्यान त्याने लिस्ट-ए कारकिर्दीतील सर्वात मोठी 174 धावांची खेळी केली आहे. (Cheteshwar Pujara)

मिडलसेक्सविरुद्धच्या या सामन्यात पुजाराने (Cheteshwar Pujara) नाणेफेक गमावले. त्यानंतर ससेक्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. 95 धावांवर संघाच्या दोन विकेट पडल्या. पण तिसऱ्या विकेटसाठी पुजारा आणि टॉम अलसोप यांच्यात 240 धावांची जबरदस्त भागीदारी केली. पुजारा बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 3 विकेटवर 335 धावांवर पोहोचली होती. पुजारा बाद झाल्यानंतरही टॉमची फलंदाजी सुरूच राहिली आणि त्याने नाबाद खेळी केली. या सामन्यात टॉमने 155 चेंडूंचा सामना केला आणि 5 षटकार आणि 19 चौकारांच्या मदतीने नाबाद 189 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट 121.93 होता.

600 धावा करणारा दुसरा फलंदाज (Cheteshwar Pujara)

या स्पर्धेत 600 धावांचा टप्पा गाठणारा चेतेश्वर पुजारा हा दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी मिडलसेक्सच्या स्टीफनने ही कामगिरी केली होती. त्याने आतापर्यंत 4 शतकांसह 645 धावा केल्या आहेत. पुजाराला टीम इंडियासाठी फक्त 5 वनडे खेळला आहे. यात त्याने 10 च्या सरासरीने 51 धावा केल्या असून 27 धावांची सर्वात मोठी खेळी केली आहे. 2014 पासून तो वनडे संघातून बाहेर पडला असला तरी त्याने 96 कसोटीत 6792 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने 18 शतके आणि 33 अर्धशतके फटकावली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news