Dhanashree Verma : धनश्री वर्माने पती युजवेंद्र चहलाला दिली ‘ही’ धमकी! Video व्हायरल

Dhanashree Verma : धनश्री वर्माने पती युजवेंद्र चहलाला दिली ‘ही’ धमकी! Video व्हायरल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मासोबतचा (Dhanashree Verma) एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांचा संसार मोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. दोघेही विभक्त होणार असल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. पण ती एक अफवा असल्याचे काही क्षणातच स्पष्ट झाले. महत्त्वाचे म्हणजे धनश्री आणि युजवेंद्र या दोघांनीही सोशल मीडियातून पोस्ट शेअर करत दोघांमधील संबंधा खूप चांगले असून काडीमोड होण्याचे वृत्त फेटाळून लावले होते. आता पुन्हा एकदा ही स्टार जोडी चर्चेत आली आहे.

धनश्री-युझवेंद्र दोघेही इंस्टाग्राम रीलमध्ये पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना त्यांच्या हस्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. या व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहल पत्नी धनश्रीचे (Dhanashree Verma) बोलणे ऐकून आनंदाने डोलत आहे. कारण त्याची पत्नी असं काही बोलते की ते ऐकून चहल आनंदाच्या भरात गुणगुणू लागतो. वास्तविक, काही दिवसांपूर्वी चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांच्या नात्याबाबत अनेक बातम्या आल्या होत्या. ज्यामध्ये त्यांच्या ब्रेकअप आणि घटस्फोटाची चर्चा चर्चेत होती.

नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघेही सोफ्यावर एकत्र बसले आहेत. धनश्री (Dhanashree Verma) युझवेंद्रला सांगते की ती एका महिन्यासाठी तिच्या माहेरी जात आहे. हे ऐकून युजवेंद्रच्या आनंदाला पारावार उरत नाही आणि तो नाचू लागतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून तीन तासांत साडेपाच लाख युजर्सनी पाहिला.

चहल झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियासोबत गेला नव्हता पण 2022 च्या आशिया कपसाठी तो भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान युएईमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ दुबईला रवाना झाला आहे. या स्पर्धेत भारताला 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा असून हा हाय व्होल्टेज सामना दुबईत खेळवला जाणार आहे. मागच्या वर्षी टी 20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर 10 गडी राखून विजय मिळवला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news