जोडी की बेडी : बिग बॉस मराठी-३ च्या घरात होणार ‘हल्लाबोल’

जोडी की बेडी : बिग बॉस मराठी-३ च्या घरात होणार ‘हल्लाबोल’

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठी या शोच्या घरात दुप्पट आव्हानं आणि दुप्पट अडथळे घेऊन स्पर्धेचा दुसरा आठवडा काल सुरू झालाय. बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये जोडी की बेडी ही आठवड्याची थीम आहे. काल बिग बॉस यांनी सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या.

संपूर्ण आठवडाभर सदस्यांना या जोड्यांसोबतच रहाणे अनिवार्य असणार आहे असे जाहीर केले. काल घरामध्ये बर्‍याच गोष्टी घडल्या. एकेमकांना सल्ले देणे, strategy सांगणे, दुसर्‍या ग्रुपमध्ये दाखल होणं, असे बरेच काही बघायला मिळाले. तसंच बिग बॉस यांनी सदस्यांनवर "नावं मोठे लक्षण खोटे" हे नॉमिनेशन कार्य सोपावले.

ज्यामध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले. जय, गायत्री, विशाल, विकास, आविष्कार, मीनल आणि शिवलीला. काल मीनल आणि स्नेहामध्ये मोठा वाद देखील झाला.

ज्यामध्ये दोघींनी आपआपले मुद्दे सदस्यांनसमोर मांडले. आज बघूया या टास्कमध्ये पुढे काय होते.

आज घरामध्ये होणार आहे "हल्ला बोल"… हा टास्क नक्की काय असणार आहे ? या टास्क मधून सदस्यांना काय मिळणार आहे ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून असे दिसून येते आहे की, एका टीम मधील दोन सदस्य त्या मोटर बाईक वर बसणार आहेत आणि दुसर्‍या टीममधील सदस्य त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्रोमोमध्ये मोटर बाईकवर बसलेली पहिली जोडी आहे सोनाली आणि सुरेखा कुडची तर दुसरी जोडी आहे विशाल आणि विकास. या बसलेल्या सदस्यांवर पाण्याचा मारा होताना दिसतो आहे, धूर देण्यात येत आहे. म्हणजेच त्यांना त्या मोटर बाईकवरुन उतरवण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात येणार आहे.

बघूया या हल्ला बोल टास्कमध्ये कोणाची टीम विजयी होणार ? आणि कोणाला हार पत्करावी लागणार. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

दरम्यान, शिवलीला पाटील यांनी या घराविषयी आपले मत व्यक्त केलंय. शिवलीला म्हणाल्या, मला मान्य आहेत सगळ्या गोष्टी. मला गेम कळायला थोडा वेळ लागला. पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग दिसेल.

बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे. इथे फक्त काड्या, कुचर्‍या एवढचं केलं जातं असं प्रत्येक जण म्हणतं. पण मी असा विचार करून आले होते.

जेव्हा इथे येईन ना तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठ दिवस जरी राहिले ना तरी. ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन. त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news