सावधान! Roblox आणि PUBG सारख्या गेम्समधून लाखो यूजर्संचा आर्थिक डेटा हॅक

सायबर गुन्हेगार
सायबर गुन्हेगार

पुढारी ऑनलाईन : जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर गेम खेळायला आवडत असेल तर सावधान! कारण तुम्हाला आवडणाऱ्या या गेम्समधूमन मालवेअरच्या साहाय्याने तुमचा आर्थिक टेडा चोरला जात आहे. आत्तापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक यूजर्सचा डेटा हॅकचे शिकार बनले आहेत. एका रिपोर्टनुसार रोबलोक्स (Roblox), फीफा, पबजी, माइनक्राफ्ट यासारख्या लोकप्रिय २८ गेम्समधून, लाखो यूजर्सचा डेटा हॅक झालेला आहे. जुलै २०२१ ते जून २०२२ च्या दरम्यान मायवेअरच्या मदतीने यूजर्सचा आर्थिक डेटा चोरी केला गेला आहे.

रिपोर्टनुसार, जवळपास ९२ हजार फाईल्समधून, ३ लाख ८४ हजार पेक्षा अधिक यूजर्संचा वित्तीय डेटा हॅक करण्यात आला आहे. रेडलाईन एक पासवर्ड चोरी करणारे सॉफ्टवेअर आहे, जे यूजर्सच्या डिव्हाईसमधील पासवर्ड, बँक कार्ड डिटेल्स, क्रिप्टोकरन्सी वॉलेट, आणि VPN सेवा यामधून संवेदनशिल डेटा काढून घेते.

कास्परस्कील लॅबच्या वरिष्ठ सुरक्षा संशोधक एंटोन वी इवानोव यांनी सांगितले आहे की, सायबर गुन्हेगार ऑनलाईन मोबाईल गेम खेळणाऱ्यावर हल्ला करणे. त्यांच्या क्रेडिट कार्ड डेटापासून ते त्यांचे गेम खाते चोरण्यासाठी अनेक नव्या योजना, उपकरणे आणि सॉफ्टवेअर बनवत आहेत. नंतर ते याची विक्रीही करू शकतात. कास्परस्कील ही रशियातील बहुराष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि अँटी-व्हायरस लॅब आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास ई-स्पोर्टस्वर स्ट्राईक टाकण्यास जगभरात प्रसिद्ध आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news