‘Google’चा रशियावर सायबर स्ट्राईक, ‘Play Store’वरील सरकारी ॲप ब्लॉक! | पुढारी

‘Google’चा रशियावर सायबर स्ट्राईक, ‘Play Store’वरील सरकारी ॲप ब्लॉक!

न्यूयॉर्क, पुढारी ऑनलाईन : रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांनी रशियावर विविध निर्बंध लादले आहेत. सोशल मीडिया साईट्स आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांनीही रशियाविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. गुगल (Google)ने रशियन प्रसारमाध्यामांच्या वाहिन्यांची ॲप्स ब्लॉक केली आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने Google Play Store वर RT News आणि Sputnik शी संबंधित मोबाईल अॅप्स ब्लॉक केले आहेत. याआधी यूट्यूबने या दोन्ही माध्यमांशी संबंधित यूट्यूब वाहिन्यांवर बंदी घालून रशियाला झटका दिला होता.

विशेष म्हणजे, अनेक टेक कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर रशियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांवर बंदी घातली आहे. गुगलप्रमाणेच अॅपलनेही यापूर्वीच कडक पावले उचलली आहेत. त्यांनीही RT News आणि Sputnik या वाहिन्यांचे ॲप App Store मधून काढून टाकले आहेत. युक्रेनबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल या वृत्तवाहिन्यांवर बंदी घालण्यात आली.

RT News ने आपली भूमिका मांडली..

या प्रकरणी, RT News चे डेप्यूटी एडिटर इन चीफ बेल्किना यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले की, टेक कंपन्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांच्या मीडिया आउटलेटवर आपमच्या वाहिन्यांच्या ॲपवर बंदी घातली आहे. मात्र, स्पुटनिकने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गुगलने या दोन्ही न्यूज साइट्सचे अॅप युरोपमधील प्ले स्टोअरवर ब्लॉक केले आहेत.

YouTube वरही ब्लॉक…

दरम्यान, YouTube ने यापूर्वीच रशियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांच्या वाहिन्यांवर कारवाई केली आहे. त्यांनी RT News आणि Sputnik च्या युट्यूब चॅलल्सना ब्लॉक करून जाहिरातीतून होणारी कमाई थांबविली होती. फेसबुकच्या मेटा कंपनीनेही अशी पावले उचलली आहेत. युरोपीय देशांच्या मागणीनुसार रशियन मीडियाला युरोपमधील त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मेटाने दिली होती.

गुगल-अ‍ॅपलच्या अनेक सेवा बंद..

याशिवाय गुगलने, Google Maps चे लाईव्ह ट्रॅफिक फीचर आणि Apple ने Apple Maps चे ट्रॅफिक आणि लाईव्ह इंसीडेंट फिचर बंद केले आहे.

 

Back to top button