ATM : एटीएमचे क्लोन करून पैसे उकळणाऱ्या दोघांना बिहारमधून अटक

Karad Crime : डिलीव्हरी बॉयची फसवणूक; आंतरराज्य टोळी गजाआड
Karad Crime : डिलीव्हरी बॉयची फसवणूक; आंतरराज्य टोळी गजाआड
Published on
Updated on

यवतमाळ शहरात गेल्या काही दिवसांपासून एसबीआयच्या एटीएममधून ( ATM ) पैसे काढणाऱ्या ग्राहकांचे एटीएम क्लोन केले जात होते. तब्बल १५ जणांच्या एटीएमचे ATM ) क्लोन करून पैसे उकळण्यात आले होते. या गुन्ह्याचा सायबर पथकाने शोध घेऊन क्लोन करणारी टोळी बिहारच्या गया जिल्ह्यातून जेरबंद केली.

सुरेशकुमार अनिल सिंग व सुधीरकुमार निर्मल पांडे ( रा. गया बिहार) अशी दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळ शहरातील सत्य साई ज्योत मंगल कार्यालयाजवळच्या एटीएमपाठोपाठ अँग्लो हिंदी हायस्कूल जवळच्या एसबीआय एटीएममध्येही पैसे काढणाऱ्यांचे कार्ड क्लोन केले गेले. यानंतर एटीएम धारकांच्या खात्यातील पैसे गायब व्हायचे यामुळे याबाबतचा गुन्हा अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होता.

यानंतर पोलिसांनी तपास कार्यास सुरूवात केली. यात आरोपींनी एटीएममशीनमध्येच इंटरनल एटीएम स्कॅनर बसवले असून त्यातून ते हॅन्ड एटीएम स्कॅनरच्या माध्यमातून बनावट एटीएम तयार करत असल्याची माहिती समोर आली. या माहितीवरून पोलिस आरोपींच्या शोधात होते.

यानंतर सायबर पथकाने बिहारच्या गया जिल्ह्यातून सुरेशकुमार सिंग व सुधीरकुमार पांडे या दोघांना अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी १५ एटीएम कार्ड तयार करून त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे उघडकीस आले.
या टोळीने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड येथेही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव दरणे, एलसीबी पीआय प्रदीप परदेशी, सायबर सेलच्या प्रमुख दीपमाला भेंडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमोल पुरी, गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, उल्हास कुरकुटे, अजय निंबोळकर, पंकज गिरी, सतीश सोनोने, रोशनी जोगळेकर, प्रगती कांबळे यांनी ही कार्यवाही केली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news