विराट कोहलीचे नेतृत्व : मायकल वॉगनकडून कडवट विश्लेषण - पुढारी

विराट कोहलीचे नेतृत्व : मायकल वॉगनकडून कडवट विश्लेषण

पुढारी ऑनलाईन डेस्क

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्स बरोबरचा एलिमनेटर सामना गमावला. आरसीबीचे हंगामातील आव्हान संपुष्टात आले याचबरोबर आयपीएलमधील विराट कोहलीचे नेतृत्व देखील लयाला गेले. आता विराट कोहली आयपीएलमध्ये आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार नाही. ज्यावेळी केकेआरच्या शाकिबने अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विजयी धाव घेतली त्यावेळेपासूनच आयपीएलमधील विराट कोहलीचे नेतृत्व कसे होते, याची समीक्षा सुरु झाली होती.

अनेक जाणकारांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाची समीक्षा केली. मात्र इंग्लंडला माजी कर्णधार मायकल वॉगनने मावळता कर्णधार विराट कोहलीचे नेतृत्व कसे होते याची समीक्षा अत्यंत कडवट शब्दात केली. वॉगन यांनी क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आयपीएलमधील विराट कोहलीचे नेतृत्व हे एक असे नेतृत्व आहे जे जिंकू शकले नाही. याची अशीच समीक्षा होते. उच्च दर्जाच्या खेळात आपल्या मर्यादा वाढवणे, ट्रॉफी जिंकणे, विशेष करुन ज्या स्तरावरचे क्रिकेट विराट कोहली खेळतो तेव्हा तर हे करणे गरजेचे असते. मी असे म्हणत नाही की तो असा आहे. मात्र विराट आयपीएल विजेतेपद मिळाले नाही म्हणून स्वतःला आयपीएलमधला एक अयशस्वी कर्णधार म्हणून पाहत असेल. कारण विराट एक यशासाठी आसुसलेला खेळाडू आणि व्य.िक्तमत्व आहे.’

हेही वाचा : IPL 2021 Eliminator : ‘आरसीबी’ पराभूत झाल्‍यानंतर विराट म्‍हणाला…

विराट कोहलीचे नेतृत्व : कसोटीत अविश्वसनीय मात्र..

मायकल वॉगनने कसोटीतील विराट कोहलीचे नेतृत्व याबाबत बोलताना म्हणाला, ‘विराट कोहलीने कसोटी संघासोबत आणि कसोटी क्रिकेटमध्ये जे काही केले, त्याने भारताचा कसोटी संघ ज्या प्रकारे बांधला ते अविश्वसनीय आहे. एकदिवसीय क्रिकेट आणि टी २० क्रिकेटचा राष्ट्रीय संघ आणि आरसीबीचा संघ याबाबत खरं सांगायचं तर तो खूपच कमी पडला.’

वॉगन म्हणाला की, आरसीबीचा संघ आयपीएल २०२१ साठी चांगला तयार होता. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाबतीत संघाचे कॉम्बिनेशन योग्य होते. वॉगन पुढे म्हणाला, ‘संघात चांगेल गुणवान, दर्जेदार खेळाडू होते. त्यांच्या खोल फलंदाजीमुळे आरसीबीचा संघ फलंदाजीच्या बाबतीत चांगला होता. यावर्षी मॅक्सवेल, हर्षल पटेल आणि यझुवेंद्र चहल हे गोलंदाज चांगल्या भरात होते. तरीही ते विजेतेपदापासून दूर राहिले.’

विराट कोहली भारतीय टी २० संघाचे वर्ल्डकप झाल्यानंतर कर्णधारपद सोडणार आहे. टी २० वर्ल्डकप येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये सुरु होणार आहे.

हेही वाचा : RCB vs KKR : विराटच्या आरसीबीचा पुन्हा एकदा प्ले ऑफमध्ये ‘गेम ऑफ’

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button