BBM 3 : गायत्री दातारने केली आदिशची नक्कल - पुढारी

BBM 3 : गायत्री दातारने केली आदिशची नक्कल

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीमध्ये काल सिझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली. आदिश वैद्य घरामध्ये जाताच त्याला एक नवा टास्क देण्यात आला. त्याने तो पुर्णपणे निभावला देखील. पॉवरकार्ड स्वीकारले आणि त्याची किंमत घरातील तीन सदस्यांना आता मोजावी लागत आहे. दादुस, मीनल आणि जय हे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घराचे पहारेकरी असणार आहेत. काल जय आणि आदेशमध्ये खूप मोठा राडा झाला. आदिश घरामध्ये आल्यापासून घरातील काही सदस्यांचे त्याच्याविषयीचे मत बरं नाही असे दिसून येत आहे. काल त्यावर चर्चा झालीच आणि आजदेखील होणार आहे. जय, स्नेहा, गायत्री दातार आणि उत्कर्ष त्याच्याविषयी बोलताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे गायत्री दातार आदिशची नक्कल करताना दिसतेय.

जय गायत्रीला सांगणार आहे, “एक खरं बोलू का गायत्री, आवडतं मला तुझं अॅटीट्यूड”. ती म्हणाली, “माझ्या फ्रेंडला कोणी काही बोल तर मी तोंडावर बोलणार. उत्कर्ष म्हणाला, “तो कॉमेडी” आहे, जयचं पण म्हणण पडलं कसा चालतो तो बघितलं का ? जसा काही हा कोणी सव्वाशेर, खरंच कॉमेडी आहे.

गायत्री तो कसं चालतो याची नक्कल करून दाखवणार आहे. स्नेहा म्हणाली, “मी त्याच्याकडे बघून बोलत नव्हते तर तो मला बोला तू माझ्याकडे बघत पण नाहीये. उत्कर्ष म्हणाला, “त्याचा हा सगळा दिखावा आहे”. इथे सगळ्यांना वाटतं आहे दोन दिन की चांदी है ! बघूया पुढे या चर्चेमध्ये काय काय बोललं गेलं आजच्या भागामध्ये.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा सोम ते रवि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button