Pakistani terrorist : पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, 'एके 47' रायफलसह शस्‍त्रसाठा जप्‍त - पुढारी

Pakistani terrorist : पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, 'एके 47' रायफलसह शस्‍त्रसाठा जप्‍त

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

गेल्या पंधरा वर्षांपासून दिल्लीत लपून राहत असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याला (  Pakistani terrorist )  दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.  अटक करण्‍यात आलेल्‍या पाकिस्तानी दहशतवाद्याकडून  (  Pakistani terrorist ) एके 47 असॉल्ट रायफल, हातबॉम्ब आणि अन्य विस्फोटक सामुग्री जप्त करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची त्याची योजना होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दिल्लीतील रमेश पार्क, लक्ष्मीनगर भागात लपून राहणार्‍या या दहशतवाद्याचे नाव मो. अशरफ असे असून, तो पाकिस्तानमधील पंजाबचा रहिवासी आहे. ठिकठिकाणी तो बनावट भारतीय आयकार्ड वापरीत असे. गैरकृत्य प्रतिबंधक कायदा, विस्फोटक कायदा, आर्म्स अ‍ॅक्ट तसेच इतर कलमांअन्वये त्याच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.

पाेलिसांनी घेतली घराची झडती ( Pakistani terrorist )

लक्ष्मी नगर येथील त्याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. दिल्ली व परिसरात दहशतवादी हल्ले घडवून आणणार असल्याचे इनपूट मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक ते निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात आला आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button