रॉयल चॅलेंजर बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा एलिमनेटर सामना गमावला आणि आरसीबीचे खेळाडू ट्रोल होऊ लागले. या ट्रोलिंगचा सर्वात जास्त फटका हा डॅनियल ख्रिस्तियन याला बसला. काही विकृत इन्स्टाग्राम युजर्सनी डॅनियल ख्रिस्तियनच्या खराब कामगिरीवरुन त्याच्या पत्नीला थेट मेसेज करुन त्रास देण्यास सुरुवात केली.
डॅनियल ख्रिस्तियन केकेआरविरुद्धच्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याला फलंदाजीत आणि गोलंदाजीतही काहीच चमक दाखवता आली नाही. त्याने फलंदाजीत ९ धावा केल्या तर गोलंदाजीत २९ धावा देऊनही त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. त्याने १.४ षटकात तब्बल १७.४० च्या सरासरीने २९ धावा दिल्या.
या खराब कामगिरीनंतर काही इन्स्टाग्रामवरील विकृत युजर्सनी त्याच्या गर्भवती बायकोला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर दुःखी झालेल्या डॅनियल ख्रिस्तियनने या असभ्य कमेंटचे स्कीनशॉट आपल्या इन्स्टाग्राम स्टेटस म्हणून ठेवले. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले की, 'माझ्या पत्नीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरील कमेंट सेक्शन पाहिला. मी आज काही खास खेळू शकलो नाही. पण, हा खेळ आहे. पण, यापासून माझ्या पत्नाला लांब ठेवा.'
डॅनियल ख्रिस्तियन पुढे म्हणाला की, 'सोशल मीडियावर काही लोक वाईट गोष्टी करत आहेत हे खूप घृणास्पद आहे. आम्हीही माणसं आहोत आम्ही प्रत्येक दिवशी आमचे सर्वस्व पणाला लावतो. असभ्य व्यक्ती होण्यापेक्षा चांगले व्यक्त होण्याचा प्रयत्न करा.'
ऑस्ट्रेलियन संघसहकारी डॅनियल ख्रिस्तियन बद्दल घडलेल्या या प्रकाराचा ग्लेन मॅक्सवेलनेही निषेध नोंदवला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिलेल्या पोस्टमध्ये मॅक्सवेल म्हणतो, 'खेळाडूंनी आजच्या सामन्यात आपले सर्वस्व पणाला लावले. त्याचे कौतुक आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या 'खऱ्या' चाहत्यांचे आभार. पण, दुर्दैवाने काही भयंकर लोकं सोशल मीडियावर आहेत त्यांनी सोशल मीडिया एक भयानक ठिकाण करुन ठेवले आहे. हे कधीही स्विकारार्ह नाही. कृपा करुन त्यांच्यासारखे होऊ नका.'
विराट कोहलीचा उत्तराधिकारी कोण होणार?
[box type="shadow" align="" class="" width=""][visual_portfolio id="40771"][/box]