पुढारी ऑनलाईन डेस्क : आषाढी वारीमध्ये वारकर्यांना विशेष हवामान सेवा पुरवण्यात येणार आहे. वारी मार्गातील हवामानाची निरीक्षणे, पुर्वानुमान आदी माहिती हवामान संशोधन आणि सेवा, पुणे आणि प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून संयुक्तपणे दिली जाणार आहे. (Ashadhi Wari 2023)
पंढरपूर आषाढी एकादशी पायी वारीमध्ये लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकाेपर्यातून सहभागी हाेतात. यंदा तुकाराम महाराज पालखी १० जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ११ जून रोजी आळंदी येथून प्रारंभ हाेईल. २८ जूनला आषाढी एकादशीला दोन्ही पालख्या पंढरपूर विठ्ठल मंदिरात पोहोचतील. भारतीय हवामान खात्याने या संपूर्ण कालावधीत विशेष हवामान सेवा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. ही हवामान सेवा "हवामान संशोधन आणि सेवा, पुणे" आणि "प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई" यांच्याकडून संयुक्तपणे दिली जाणार आहे.
(तपशीलवार हवामान अद्यतनांसाठी कृपया www.imdpune.gov.in मध्ये Pune Weather ला भेट द्या. किंवा QR कोड स्कॅन करा.)
हेही वाचा