Amruta Khanvilkar : स्लिव्हलेस ब्लॉऊजमध्ये ‘ब्लॅक ब्युटी’ चंद्रमुखीचा अनोखा अंदाज

Amruta Khanvilkar : स्लिव्हलेस ब्लॉऊजमध्ये ‘ब्लॅक ब्युटी’ चंद्रमुखीचा अनोखा अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अदाकारीने आणि अभिनयाने चाहत्यांना भूरळ घालणारी अभिनेत्री अमृता खानविलकरचा ( Amruta Khanvilkar ) प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी (२९ एप्रिल ) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट मराठी कादंबरीकार विश्वास पाटील याच्या चंद्रमुखी या बहुचर्चित कादंबरीवर आधारीत आहे. या चित्रपटात चंद्रमुखीची मुख्य भूमिका अमृता खानविलकरने साकारली आहे. याच दरम्यान तिने आपल्या नवनविन फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती ब्लॅक रंगाच्या साडीत आणि स्लिव्हलेस ब्लॉऊजमध्ये दिसत आहे. या फोटोंना पोझ देताना तिने कधी स्वत: च्या ओटावर तर कधी मानेवर हात ठेवला आहे. यातील खास बाब म्हणजे, अमृताने ब्लॅक रंगाच्या साडीत दिलेली हटके पोझ चाहत्यांना भूरळ घालत आहे. यासोबत तिने गळ्यात पेंटेन्ट घातले आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने #blackswan, #ivegotwings #wingedeyeliner #onpoint, #blackmagic यासारखे टॅग दिले आहे. चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्याने ती खूपच चर्चेत आली आहे. यासोबत अमृताने साडीवर खास करून एक सुंदर असा बेल्ट परिधान केला आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

अमृताचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह मराठी कलाकारंनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात मराठी कलाकार प्रसाद ओकने आपली प्रतिक्रिया देताना '???' असे तीन ईमोजी शेअर केले आहेत. अमृताने स्वत: आपल्या फोटोवर '??? ab' अशी हटके कॉमेन्टस देखिल केली आहे. तर चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी 'Diva ❤️'अशी प्रतिक्रिया दिली आहे.

याशिवाय काही नेटकऱ्यांनी 'Stunning Amu ??', 'back beauty…….❤️❤️', 'Pretty girl ??', 'Beautiful', 'Muahhhhhhhhhh' , 'बाण नजरंचा?️?', 'Lovely?' आणि '?❤️waw' यासारख्या अनेक भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय काही युजर्सनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

अमृताने चंद्रमुखी या मराठी चित्रपटात ढोलकीच्या ताल, घुंगरांचे बोल आणि साजश्रृंगार, सौंदर्याची नजाकतसोबत दिलखेचक अदांनी घायाळ करणारी नृत्यागंनेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता आदीनाथ कोठारेने दौलत देशमानेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता प्रसाद ओक आणि पटकथा – संवाद चिन्मय मांडलेकर याने लिहली आहे. तर चित्रपटाला अजय- अतुल यांचे संगीत लाभले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news