Asharam 3 : ईशा गुप्ताचा बॉबी देओलसोबत बोल्डनेसचा तडका! (Video) | पुढारी

Asharam 3 : ईशा गुप्ताचा बॉबी देओलसोबत बोल्डनेसचा तडका! (Video)

मुंबई, पुढारी ऑनलाईन : बरेच वाद असूनही बॉबी देओलच्या आश्रम या वेब सीरिजचे दोन्ही सीझन धमाकेदार झाले. दोन्ही सीझनच्या जबरदस्त हिटनंतर आता या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला चाहत्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. आश्रमच्या नव्या सीझनमध्ये बहुतांश पात्रे तीच आहेत, मात्र यावेळी बॉबी देओलसोबत अभिनेत्री ईशा गुप्ताही दिसणार आहे. अभिनेत्रीच्या एन्ट्रीमुळे ही मालिका मनोरंजक आणि तितकीच बोल्ड झाल्याची चर्चा आहे. (asharam 3 esha gupta bobby deol bold scene)

OTT प्लॅटफॉर्म MXPlayer वर सर्वात चर्चित वेब सिरीज ‘आश्रम 3’ रिलीज होण्यासाठी सज्ज झाली आहे. फक्त काही दिवसच वाट पहावी लागणार आहे. त्यानंतर ३ जूनच्या मुहुर्तावर प्रकाश झा दिग्दर्शित आश्रमाचे दरवाजे उघडतील. जिथे बाबा निराला आपल्या भ्रमाचे जाळे पसरण्यास सज्ज असेल. तिस-या सीझनमध्ये बाबा निरालाच्या जाळ्यात एक नवी सुंदरी अडकणार असून ही भूमिका अभिनेत्री ईशा गुप्ताने साकारली आहे. आश्रम ३ मध्ये ईशाच्या एन्ट्रीने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. यापूर्वी प्रकाश झा यांच्यासोबत काम ईशाने काम केले आहे. पण ‘आश्रम ३’ साठी कास्ट होणे हे तिचे स्वप्न होते असे खुद्द इशानेच अनेक मुलाखतींमध्ये बोलून दाखवले आहे. (asharam 3 esha gupta bobby deol bold scene)

ईशा गुप्ता म्हणते, ‘लॉकडाऊन दरम्यान जेव्हा मी आश्रम ही वेब सीरीज पाहिली तेव्हा मीही याचा एक भाग व्हावे अशी प्रार्थना केली होती. आणि नकळत ती आता माझी इच्छा पूर्ण झाली आहे. ही सीरिज मिळणे ही माझ्यासाठी निसर्गाकडून मिळालेली भेट आहे असे वाटते.’

आश्रम ३ मधील ईशा गुप्ताचे पात्र हे एका इमेज मेकर स्पेशालिस्टचे आहे, जे बाबाजींना त्यांचे व्यक्तिमत्त्व विस्तारण्यासाठी, आश्रमातील त्यांच्या कृती आणि त्यांच्या पुढाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक शक्तिशाली धार्मिक नेता म्हणून त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मदत करते. पण ईशा बाबाजी आणि त्यांच्या शिकवणीचा प्रचार करू शकेल का, की ती बाबाजी आणि त्यांच्या कृतींचा पर्दाफाश करेल? या प्रश्नांची उत्तरे ३ जून नंतरच प्रेक्षकांना समजणार आहेत. या भूमिकेची तयारी करताना ईशाने पात्राची मानसिकता आणि व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी एका मैत्रिणीकडून मार्गदर्शनही घेतल्याचेही तिने मुलाखतीत म्हटले आहे. (asharam 3 esha gupta bobby deol bold scene)

प्रकाश झा निर्मित आणि दिग्दर्शित आश्रम ३ मध्ये बॉबी देओल, अदिती पोहनकर, चंदन रॉय सन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, ईशा गुप्ता, सचिन श्रॉफ, अध्यायन सुमन, त्रिधा चौधरी, विक्रम कोचर, अनुरिता के झा, रुशाद राणा, तन्मय रंजन, प्रीति सूद, राजीव सिद्धार्थ आणि जया सील घोष यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजचे सर्व भाग MX Player वर ३ जून २०२२ पासून प्रसारित केले जातील, जे विनामूल्य पाहता येतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

Back to top button