Sushmita : रिलेशनशीपमध्ये असूनही सुष्मिताने का केलं नव्हतं लग्न?

sushmita sen
sushmita sen
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या लग्नाच्या विषयावरून चर्चेत आहे. ती बिजनेसमॅन ललित मोदीला डेट करत असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. ललित मोदीने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून फॅन्सना आनंदाची वार्ता दिलीय. पण, तसं पाहिलं तर वयाच्या ४६ व्या वर्षीही सुष्मिता अविवाहित आहे. ती रिलेशनशिपमध्ये तर राहिली, पण लग्न कधीचं कलं नाही. अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या एका चॅट शोमध्ये सुष्मिताने याबाबत खुलासा केला. आपल्या मुलांच्या कारणास्तव लग्न केले नाही. ती तीनवेळा लग्नबंधनात अडकणार होती. मात्र, प्रत्येक वेळी काही कारणाने सुदैवाने ती वाचली. लग्नाआधी आपल्या आयुष्यातून तिने त्या-त्या व्यक्तीला दूर केलं.

सुष्मिता सेन दोन मुलींची सिंगल मदर आहे. सुष्मिताने रेने आणि अलीषाला दत्तक घेतले आहे. ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये सुष्मिताने लग्न, मुले आणि रिलेशनशीपवर बातचीत केली. सुष्मिताने म्हटलं होतं की, माझ्या मुलींनी कधीचं रुसवा केला नाही. माझ्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला घेऊन त्या कधीच राग मानत नसतं.

सुष्मिता म्हणाली, मी जेव्हा रेनेला दत्तक घेतलं तेव्हा माझ्या आयुष्यात एकही व्यक्ती नव्हती. यानंतर माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांना माझे प्राधान्यक्रम कळू शकले नाहीत. बरं, माझी जबाबदारी कुणाकडून वाटून घ्यावी, अशी माझी अपेक्षाही नाही. पण तुम्ही मला मुलांपासून दूर राहायलाही सांगू शकत नाही. माझ्या मुलींना माझी गरज आहे. सुदैवाने मला माझ्या आयुष्यात खूप छान लोक भेटले. मी कधीच लग्न केले नाही याचे एकमेव कारण म्हणजे ते निराश झाले होते. माझ्या मुलांशी त्याचा काहीही संबंध नव्हता. पण, मुलांना त्यांची कधीच अडचण नव्हती. माझे तीनदा लग्न होता होता वाचले. त्यावेळी काय घडलं, हे नेमकं मी सांगू शकत नाही. मी एवढेच म्हणू शकते की देवाने मला आणि माझ्या मुलांना वाचवले.

सुष्मिता सेन गेल्या वर्षीपर्यंत मॉडेल आणि अभिनेता रोहमन शॉलला डेट करत होती. दोघेही बरेच दिवस वेगळे राहत होते. पण, अचानक एके दिवशी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या. सुष्मिता सेनने मौन तोडले आणि लिहिले की रोहमन आणि तिचे मार्ग वेगळे झाले आहेत. चाहत्यांनाही स्पष्ट कळाले. आता ललित मोदींसोबत संबंध असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघांचे लग्न कधी होणार हे येणारा काळच सांगेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news