पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्याने हंगामाची सरासरी जुलैच्या दुसर्या आठवड्यातच गाठली असून, सरासरीपेक्षा तब्बल 67 टक्के जास्त पाऊस झाला आहे. 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात 314.3 मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस सुरू असून, गेल्या 14N दिवसांत संपूर्ण चित्र बदलून गेले आहे. जून महिन्यात पावसाची सरासरी उणे 75 टक्के होती. मात्र, जुलैमध्ये चित्र पूर्ण बदलले. गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांनी सरासरी पार केल्याने 14 रोजी जिल्ह्यात एकूण 314 मिमी पाऊस झाल्याने सरासरी 67 टक्क्यांनी अधिक झाली.
गुरुवारी झालेला पाऊस..(मिमी मध्ये)
भोर 262, लवासा 180, लोणावळा 160, गिरिवन 115, माळीण 99, पाषाण 69, वडगांव शेरी 68.5, नारायणगाव 47, तळेगाव 48, डुडुळगाव 38, राजगुरुनगर 30, शिरूर 21, हवेली 21, पुरंदर 18.5, दौंड 14.5, बारामती 11.