पिंपरी : पावणे सहा लाखांची रोकड काढून चोरट्यांनी एटीएम मशीन पेटवून दिले. ही घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी सातच्या सुमारास मराठा क्रांती चौक, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली.
याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे येथील क्रांती चौकात एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्याने रात्री एक ते सकाळी सातच्या दरम्यान गोपनीय कोडच्या आधारे एटीएम मशीन खोलले. मशीनमधील पाच लाख 82 हजार 500 रुपये काढून घेतले. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चोरट्यांनी चक्क एटीएम सेंटर पेटवून दिले.