Improper Relationship : ग्लॅमरस महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत लफडं; एसपी आला अडचणीत

improper relationship
improper relationship

ब्रिटनमध्ये सध्या एका विवाहित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे तरुण महिला अधिकाऱ्याशी असलेले अनैतिक संबंधाचे (Improper Relationship) प्रकरण गाजत आहे. २१ वर्षाच्या तरुण महिला पोलिस अधिकाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या आरोपाखाली ३८ वर्षाच्या एका मुख्य पोलिस अधीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव डॅनियल ग्रीनवूड आहे. त्यांच्यावर २१ वर्षीय प्रोबेशनवर असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. सदर महिला अधिकारी ग्रीनवूड यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत आहे. पण तिलाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणी अधिक चौकशी केली जात असून दोघांमधील संभाषणाचे मेसेजीस आणि भेटीची माहिती तपासली जात असल्याचे समजते. वेस्ट यॉर्कशायर पोलिसांच्या चीफ कॉन्स्टेबलना या प्रकरणाबद्दल माहिती देण्यात आली आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंध (Improper Relationship) प्रकरणी पोलिस अधिकाऱ्याच्या निलंबनाचे वृत्त ब्रॅडफोर्ड आणि लीड्समधील अधिकाऱ्यांमध्ये वणव्यासारखे पसरले आहे. निलंबित अधिकारी ग्रीनवूड यांची पोलिस खात्यात एक कौटुंबिक आणि सभ्य माणूस म्हणून ओळख आहे. त्यामुळे त्याच्या निलंबनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मुख्य पोलिस अधीक्षक असलेले ग्रीनवूड हे गेली २० वर्षे पोलिस सेवेत आहेत. ते वेस्ट यॉर्कशायर येथील बिंगले येथे वास्तव्यास आहेत. पण ते अनैतिक संबंध प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. ते या प्रकरणाच्या चौकशी अहवालाची वाट पहात आहेत.

दरम्यान, ज्या ठिकाणी मुख्य पोलिस अधीक्षक ग्रीनवूड राहतात त्याच ठिकाणी महिला अधिकारी देखील राहते. सदर महिला पोलिस अधिकारी नेहमी सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. यामुळे त्यांचे इन्स्टाग्रामवर १० हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर असलेल्या अकाऊंटवर पोलिस अधिकारी असल्याचे तिने कुठेही नमूद केलेले नाही. त्याशिवाय तिने वेस्ट यॉर्कशायर पोलिसांचे फेसबुक पेज लाईक केले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news