Urfi Javed : उर्फी जावेद क्रॉस कट ड्रेसमुळे ट्रोल, यूजर्स म्हणाले... | पुढारी

Urfi Javed : उर्फी जावेद क्रॉस कट ड्रेसमुळे ट्रोल, यूजर्स म्हणाले...

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सध्या उर्फीच्या एक व्हिडिओ सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. परंतु, यावेळी तिच्या कपड्याच्या फॅशनमुळे यूजर्संनी ट्रोल केलं आहे. अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नुकतीच मुंबईत रस्त्यावर एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली आहे. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. या व्हिडिओत ती आपल्या कारमधून बाहेर येवून चाहत्यांसोबत पोज देताना दिसली आहे. यावेळी उर्फीने काळ्या रंगाचा क्रॉस कट ड्रेस घातला आहे. या ड्रेसमुळे तिने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

क्रॉस कट ड्रेससोबत उर्फीने सुंदर सिल्व्हर रंगाचे कानातले परिघान केले आहे. या पोशाखात ती खुपच सुंदर दिसत आहे. परंतु, या ड्रेसमुळे काही युजर्संनी तिला ट्रोल केलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अनेक कमेंन्टस करून चांगल्या – वाईट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात युजर्सने तिला मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने तिला ‘शो ऑफ झाला आहे काय?, बिग बॉस नंतर उर्फी वेडी झाली आहे का?, असे लिहिले आहे. याशिवाय आणखी एका युजर्सने नो मास्क नो एन्ट्री असे मागे लिहिले असताना तिने मास्क घातलेला नाही, तर आणखी एकाने चेहरा सोडून सर्वत्र मुखवटा घालून आली आहे का?. असे म्हटले आहे.

याआधी हॉलिवूडची प्रसिद्ध मॉडेल कैंडल जैनर हिनेही असाच काळा रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या फोटोमध्ये कैंडल जैनर खूपच हॉट दिसत होती. यानंतर सध्या उर्फी जावेदने असाच ड्रेस परिधान केला आहे. यामुळे उर्फीला ट्रोल केलं जात आहे.

याआधी उर्फीने हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. हा फोटो शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘यलो डर्टी… लोक काय म्हणतात हे मला माहित नाही, पण मला वाटते की, पिवळा रंग चांगला आहे.’ यावेळी देखील तिला ट्रोल केलं गेलं होतं. उर्फी बिग बॉसमधून प्रसिद्धी झोतात आली होती. तिने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

हेही वाचलंत का? 

( video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button