‘हार्दिक पांड्याने माझ्याशी अनैसर्गिक सेक्स केला; राजीव शुक्लांनी नग्न करून नाचवले’ | पुढारी

'हार्दिक पांड्याने माझ्याशी अनैसर्गिक सेक्स केला; राजीव शुक्लांनी नग्न करून नाचवले'

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राजकारणी, हायप्रोफाइल लोक आणि क्रिकेटरबरोबर जबरदस्तीने संबंध ठेवायला भाग पाडल्याचा आरोप कुख्यात गुंड आणि दाऊद इब्राहिमचा साथीदार रियाज भाटी याच्‍या पत्नीने केला आहे. याप्रकरणाची तक्रार मुंबई पोलिसांत दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी नवाब मलिक रियाज भाटी हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तो चर्चेत आला. भाटी हा कुख्यात गुंड असून त्याच्या मदतीने फडणवीस यांनी अनेक व्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला हाेता. आता त्याच्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

हार्दिक पांड्यावर गंभीर आरोप

पीडित महिलेने तिच्या पतीवर हायप्रोफाईल लोकांसोबत सेक्स करायला भाग पाडल्याचा आरोप केला आहे. पीडितेने मुंबई पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत हार्दिक पांड्या, मुनाफ पटेल, राजीव शुक्ला आणि पृथ्वीराज कोठारी यांची नावे नोंदवली आहेत. तक्रारीमध्ये पीडिताने पांड्यावर अनैसर्गिक संभोग केल्याचा आरोप केला आहे. राजीव शुक्ला यांनी नग्न करून नाचवल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. क्रिकेटर मुनाफ पटेलनेही बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.

मात्र, मुंबई पोलिसांनी अद्याप याप्रकरणी एफआयआर नोंदवलेला नाही. एएनआयशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास केला जाईल, अद्याप तपासात गुन्ह्याची पुष्टी झालेली नाही.

ANI कडून मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी रियाझ भाटीच्या पत्नीने आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिला हाय-प्रोफाइल लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. भाटी व्यतिरिक्त त्यांनी मुंबई पोलिसांसमोर दाखल केलेल्या अर्जात ज्या लोकांवर बलात्काराचा आरोप केला आहे त्यात क्रिकेटपटू मुनाफ पटेल आणि हार्दिक पंड्या, काँग्रेस नेते राजीव शुक्ला आणि एक पृथ्वीराज कोठारी यांचा समावेश आहे.

घटस्फोटानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले

घटस्फोटानंतर भाटीने तिला उच्चभ्रू लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असे तिचे म्हणणे आहे. या महिलेने २४ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली, मात्र अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. दुसरीकडे महिलेच्या तक्रारीत विशेष तपशील नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तक्रारीत बलात्काराच्या ठिकाणाचे नाव किंवा तारखेचा उल्लेख नाही. तरीही या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले- तपासात गुन्ह्याची पुष्टी नाही.

या संदर्भात अनेकवेळा पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्याचे महिलेचे म्हणणे आहे. त्या बदल्यात मला काही पैसे देण्यास सांगितले होते, पण मी भ्रष्टाचार का पसरवू? मी माझ्या जागी बरोबर आहे. गुन्हेगार ते लोक आहेत. मुंबई पोलिसांनीही अर्ज आल्याचे कबूल केले आहे, परंतु ते म्हणाले की त्यांच्याकडे “याक्षणी अधिक तपशील नाही.” पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की आता या प्रकरणाची चौकशी केली जाईल. आतापर्यंतच्या तपासात गुन्ह्याची पुष्टी झालेली नाही.

हे ही वाचलं का ?

Back to top button