छत्रपती संभाजीनगर : अंबादास दानवेंचा पक्षांतराच्या चर्चेवर खुलासा, म्‍हणाले… | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : अंबादास दानवेंचा पक्षांतराच्या चर्चेवर खुलासा, म्‍हणाले...

छत्रपती संभाजी नगर पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु खुद्द अंबादास दानवे यांनी आज (शनिवार) या विषयीचा खुलासा करत त्याचा इन्कार केला आहे. मी पूर्वीही शिवसैनिक होतो, आताही आहे आणि उद्याही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार आहे असे दानवे यांनी म्हटले आहे.

शिवसैनिक हा कायम शिवसैनिकच असतो. मी काल आज आणि उद्याही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे. माझ्या बाबतीत सध्या सर्व अफवा सुरू आहेत असेही दानवे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button