रामदास आठवले यांचा आशावाद , शिवसेना- भाजप पुन्‍हा एकत्रित सत्तेत येतील  | पुढारी

रामदास आठवले यांचा आशावाद , शिवसेना- भाजप पुन्‍हा एकत्रित सत्तेत येतील 

तासगाव, पुढारी वृत्तसेवा:  राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडेल. भाजपसोबत युती करेल आणि राज्यात नवी सत्ता येईल, असा आशावाद केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्‍यक्‍त केला. ते तासगाव तालुक्यात सावळज येथे बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाला दुजोरा देत आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

सावळज येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे संपूर्ण बालपण आणि माध्यमिक शिक्षण झाले होते. त्यांचे गावातील अनेकांशी कौंटुबीक संबंध आहेत. दिवंगत सुनील धेंडे सर व माजी सरपंच शिवाजी पाटील, दिवाकर भिसे  यांच्या घरी सांत्वनपर भेटी दिल्या. तसेच त्यांनी रिपाईचे तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी रामदास आठवले म्हणाले, शिवसेना आणि भाजपा यापूर्वी एकत्र होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून लवकर शिवसेना बाहेर पडेल.मार्च – एप्रिलमध्ये राज्यात नवी सत्ता येऊ शकते. त्यामुळे नारायण राणे यांचे विधान बरोबर असू शकते, असेही ते म्‍हणाले.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश म्हेत्रे, रमेश कांबळे, अमोल पोळ, विजय चव्हाण, नागेश सुतार, राजेश गायकवाड, राजेंद्र कलाल यांच्यासह रिपाईचे युवानेते संदेश भंडारे, महावीर धेंडे,सुधीर धेंडे, सदाशिव धेंडे, नाना वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचलं का?

Back to top button