Nashik Crime : चारित्र्यावर संशय घेत प्रेयसीचा खून करणाऱ्यास जन्मठेप | पुढारी

Nashik Crime : चारित्र्यावर संशय घेत प्रेयसीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- परप्रांतीय प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. २०१९ मध्ये सिन्नर येथे ही घटना घडली होती.

दरवेश गेंदालाल चौरे (४०, रा. भोपाळ) असे आरोपीचे नाव आहे. सिन्नर पोलिसात दाखल गुन्ह्यानुसार, रेखा मेहरा (रा. भोपाळ) हिच्याशी आरोपी दरवेश याचे प्रेमसंबंध होते. रेखा तिच्या मुलीसह दरवेश सोबत सिन्नर येथे राहत होती. संजीवनीनगरमध्ये भाड्याच्या खोलीत ते राहत असताना दरवेश रेखाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये सतत वाद होत होते. २१ सप्टेंबर २०१९ रोजी आरोपी दरवेश याने वादातून रेखाचा ओढणीने गळा आवळून खून केला. या प्रकरणी सिन्नर पोलिसांत दरवेशविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. पी. पाटील, उपनिरीक्षक सुदाम एखंडे यांनी करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासले. जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश एस. डी. जगमलानी यांनी गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस शिक्षा ठोठावली.

हेही वाचा :

Back to top button