World Tourism Day : वेरूळ आणि अजिंठा लेण्यांची पर्यटकांना भुरळ

World Tourism Day : वेरूळ आणि अजिंठा लेण्यांची पर्यटकांना भुरळ

छत्रपती संभाजीनगर; जे. ई. देशकर : वेरूळ आणि अजिंठा लेण्यांची भुरळ देश-विदेशातील पर्यटकांना आहे. (World Tourism Day) या दोन पर्यटनस्थळांमुळेच छत्रपती संभाजीनगरचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेलेले आहे. या शहराला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देणाऱ्या लेण्यांना आज मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटक म्हणावे तेवढे त्याकडे आकर्षित होत नाहीत.

जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत, तसेच त्या ठिकाणी गेल्यानंतर पर्यटकांना पिण्याचे पाणी, थोडा आराम करण्यासाठी राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने आज पर्यटक विचार करूनच या पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. (World Tourism Day)

संबंधित बातम्या : 

रस्त्यांची दुरवस्था

आजमितीला वेरूळ आणि अजिंठा लेण्यांना जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु तो इतका खराब झाला आहे की, पर्यटकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही पर्यटक त्या ठिकाणी जाणे टाळत आहेत. ही बाब गंभीर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात असलेल्या पितळखोरा, घटोत्कच, औरंगाबाद लेणी, सुलीभंजनचा परियों का तालाब, मिनी महाबळेश्वरची उपाधी मिळालेले म्हैसमाळ शहरालगत आहेत. परंतु पर्यटक केवळ वेरूळ आणि अजिंठा याच पर्यटनस्थळांना भेटी देतात. तेथे दळणवळणासह मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने आजही ही नामांकित पर्यटनस्थळे पर्यटकांपासून वंचित आहेत.

या सुविधांची गरज

वेगवेगळ्या भाषेत इंग्रजी, हिंदी, मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये माहिती पुस्तके असावीत, अजिंठा व वेरूळ लेण्यांत इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करावी. एमआयडीसी व आयटीडीएस माध्यमातून अजिंठा व वेरूळसाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात यावी, देशातील प्रमुख पर्यटन स्थळावरून विमान कनेक्टिव्हिटी असावी, अजिंठा, वेरूळ येथे जागतिक दर्जाची पंचतारांकित हॉटेल असावीत, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई येथून वंदे मातरम सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे सुरू कराव्यात, राज्य व केंद्र शासनाच्या वतीने विशेष पॅकेज टूर आयोजित करण्यात याव्या आदी सुविधांची येथील व्यावसायिकांकडून अपेक्षा आहेत.

येथील पर्यटनस्थळांचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे. ही कमी आयटोच्या माध्यमांतून काही प्रमाणात साध्य होणार आहे. असे असले तरी पर्यटनवाढीसाठी येथे मूलभूत सुविधा दळणवळणासाठी चांगले रस्ते, आणि महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त केले तर याचा निश्चित फायदा होईल.
– जसवंत सिंग, पर्यटन व्यवसायिक

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news