मनोज जरांगे पाटलांना रूग्णालयातून डिस्चार्ज; आता पुन्हा साखळी उपोषण करणार | पुढारी

मनोज जरांगे पाटलांना रूग्णालयातून डिस्चार्ज; आता पुन्हा साखळी उपोषण करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोज जरांगे-पाटील यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रूग्णालयातून थेट जरांगे-पाटील अंतरवालीतील उपोषणस्थळी जाणार असून तिथे ते पुन्हा साखळी उपोषणाला सुरूवात करणार आहेत.

संबंधित बातम्या : 

मनोज जरांगे यांना १७ सप्टेंबर पासून छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अशक्तपणा, थकवा, घशाचा संसर्ग, किडनीवरील सूज यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. उपचारानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज होताच ते थेट अंतरवाली सराटी येथील साखळी उपोषण आंदोलनस्थळी जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या वैद्यकिय चाचण्या करण्यात आल्या. छातीचा एक्स-रे, रक्ताच्या विविध चाचण्या, इसीजी, टू डी ईको या सर्व तपासण्या करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामध्ये अनेक चाचण्या नॉर्मल आल्या होत्या. जरांगे यांना घशाचे इन्फेक्शन झाल्याने त्यांना बोलण्यास व अन्न गिळण्यास त्रास होत होता. अशक्तपणा व थकवा जाणवत असल्याने त्यांच्यावर गॅलेक्सी रूग्णालयात उपचार करण्यात आले.

हेही वाचा : 

Back to top button