कागल उपसभापती : जेसीबीमधून गुलाल उधळणे पडले महागात; उपसभापतींवरच गुन्हा दाखल | पुढारी

कागल उपसभापती : जेसीबीमधून गुलाल उधळणे पडले महागात; उपसभापतींवरच गुन्हा दाखल

कागल; पुढारी वृत्तसेवा : कागल उपसभापती पदी मनीषा संग्राम सावंत यांची निवड झाली झाली. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बानगे गावात जल्लोषात मिरवणूक काढली.

जेसीबीतून गुलाल उधळत काढलेल्या या मिरवणुकीचा जिल्हाभर चर्चा झाली होती. पण, आता हाच जल्लोष कागल पंचायत समिती सभापतींना भोवला आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून नूतन उपसभापती मनीषा संग्राम सावंत, उपसरपंच लंबे,जेसीबी मालक नेताजी पाटील, फोटोग्राफर यांच्यासह सोळा जणांवर कागल पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोरोना महामारीचे संकट गडद असताना देखील याचे भान लोकप्रतिनिधींना ठेवले नाही. उपसभापती पदाची निवड होताच काढलेली मिरवणूक गंभीर आहे.

ही मिरवणूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारची दखल घेऊन पोलिसांनी याबाबतचा गुन्हा नोंद केला आहे.

अधिक वाचा :

कालग उपसभापती
कागल उपसभापती निवडीनंतरचा जेसीबीमधून जल्लोष

बानगे येथील पंचायत समिती सदस्य मनीषा सावंत यांची पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली.

त्यानंतर त्यांची मिरवणूक गावातून काढण्यात आली. या मिरवणुकीला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ ही सहभागी झाले होते.

सभापती आणि उपसभापती निवडीनंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येऊ नये.

अशी नोटीस पोलिसांनी अगोदरच देऊन देखील त्याची दखल घेतली नाही.

उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर मनीषा संग्राम सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी गावात मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतषबाजी केली. वाजत-गाजत जेसीबीमधून गुलाल उधळीत मिरवणूक काढण्यात आली.

अधिक वाचा :

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या उपसभापती मनिषा संग्राम सावंत, संग्राम सावंत, रमेश सावंत, बानगे गावचे उपसरपंच लंबे, अमोल सावंत, सुनील बंगार्डे, सुरेश मारुती गुरव, सुशांत शिवाजी घेवडे, सुरज नलवडे, अशोक निवृत्ती पाटील, दत्ता सावंत, मदन शामराव पाटील, दत्तात्रय लंबे, फोटोग्राफर विनायक पाटील जेसीबी मालक नेताजी पाटील आदींवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचले का:

पाहा : छत्रपती शाहू महाराजांचे पर्यावरण संवर्धन व्हिडिओ 

Back to top button