Bachu Kadu : ‘एनसीपी’ला सोबत घेताना विश्वासात घेतले नाही : बच्चू कडू | पुढारी

Bachu Kadu : 'एनसीपी'ला सोबत घेताना विश्वासात घेतले नाही : बच्चू कडू

अमरावती, पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्तेत सोबत घेताना विश्वासात घेतले नाही, अशी टीका दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा प्राप्त बच्चू कडू यांनी केली. अतिरेक झाला तर स्फोट होईल असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला. (Bachu Kadu)

Bachu Kadu : एनसीपीची विचारधारा वेगळी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार बंड करीत त्यांच्या समर्थकांसह शिंदे -फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाले आहेत. राज्य सरकारमधील नवीन समीकरण अनेकांना आवडले नसल्याचे दिसून येत आहे. या नवीन समीकरणाबाबत प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी सार्वजनिक नाराजी व्यक्त केली आहे. एनसीपीला सत्तेत सहभागी करून घेताना विचार मंथन तसेच चर्चा करायला हवी होती असे ते म्हणाले. एनसीपी ची विचारधारा वेगळी असून मत विभाजनाने शरद पवार दुःखी झाले असतील. त्यांना आम्ही सांत्वना देत असून सर्वात अगोदर उद्धव ठाकरे यांनीच बंडाची सुरुवात केल्याचे कडू म्हणाले.
हेही वाचा 

Back to top button