Amol Kolhe in NCP Meet : ‘ही लढाई कर्तव्याची’; अमोल कोल्हेंकडून श्रीकृष्ण-अर्जूनाच्या संवादाचे दाखले | पुढारी

Amol Kolhe in NCP Meet : 'ही लढाई कर्तव्याची'; अमोल कोल्हेंकडून श्रीकृष्ण-अर्जूनाच्या संवादाचे दाखले

पुढारी ऑनलाइन डेस्क : Amol Kolhe in NCP Meet : श्रीकृष्णाने गोवर्धन करंगळीवर उचलला होता शरद पवार साहेब देखील आता तीच भूमिका पार पाडत आहेत. अडचणींचे असंख्य आभाळ दाटून आले तरीही न डगमगता त्यांना सामोरे जाण्यासाठी शरद पवार खंबीर आहेत. शरद पवार वडीलांप्रमाणे आहेत ज्यांनी आपल्या कष्टाने अनेकांचे पोट भरले. त्यांना आधार दिला, असे म्हणत अमोल कोल्हे हे भावूक झाले.

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शिवसेनेचा रिपीट टेलिकास्ट राष्ट्रवादीच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला. त्यानंतर आज अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघेही आमने-सामने आले. शरद पवार यांनी मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. तर अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी मध्ये बैठक घेतली. यावेळी दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. यावेळी शरद पवार यांच्या गटातून अमोल कोल्हे यांनी भूमिका मांडताना शरद पवार यांच्याविषयी विचार मांडले.

खरेतर अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांच्या शपथ विधीला अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अमोल कोल्हे अजित पवारांच्या गटात जातील अशा अटकळ्या बांधल्या जात असताना आपण शरद पवार साहेबांसोबतच राहणार, बाप हा बाप असतो असे ट्विट करत त्यांनी आपण शरद पवार यांना सोडणार नाही, असे स्पष्ट केले.
त्यामुळेच आज अमोल कोल्हे वाय बी सेंटर येथे आयोजित बैठकीत शरद पवार नेमके काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

Amol Kolhe in NCP Meet : अमोल कोल्हेंकडून श्रीकृष्ण-अर्जूनाचे दाखले

यावेळी अमोल कोल्हे हे आपल्या भावना व्यक्त करताना खूपच भावूक झाल्याचे दिसले. त्यांनी शरद पवार यांची भूमिका मांडताना त्यांनी श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादाचे दाखले दिले. श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला होता ही लढाई धर्म-अधर्माची आहे, ही लढाई कर्तव्याची आहे नात्यांची नाही. तसेच शरद पवार साहेबांनी केलेल्या अथक प्रयत्नांची त्यांच्या कष्टाची आणि वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबाबत त्यांची भूमिका मांडली. अजित पवार यांच्या बंडानंतर जेव्हा ते शरद पवार यांना भेटले. तेव्हा त्यांनी शरद पवार यांनी जे मोलाचे मार्गदर्शन केले त्याचे ट्विट अमोल कोल्हे यांनी केले आहे. हे ट्विट देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे ही वाचा :

Jitendra Awhad vs Ajit Pawar: अजित पवारांना राक्षसी महत्त्वाकांक्षा, काकांना गिळायला निघालेत : आव्हाड

जितेंद्र आव्हाडांचे मोठे विधान, म्हणाले; ‘महाराष्ट्राचा मोठा व्हिलन शरद पवार…’

 

Back to top button