NCP Crisis Sharad Pawar Meeting Live : शरद पवार गटाच्या बैठकीला १६ आमदार तर ५ खासदार उपस्थित; वाय बी सेंटरमध्ये बैठक सुरू | पुढारी

NCP Crisis Sharad Pawar Meeting Live : शरद पवार गटाच्या बैठकीला १६ आमदार तर ५ खासदार उपस्थित; वाय बी सेंटरमध्ये बैठक सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी भूकंप झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांचे आज (बुधवार) मुंबईत शक्तिप्रदर्शन होत असून, शरद पवार आणि अजित पवार यांनी त्यासाठी बैठका बोलावल्या आहेत. आजच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून सर्व आमदारांना ‘व्हिप’ बजावला आहे. या बैठकींतून काका – पुतण्याच्या गटांना किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच्या या पेचप्रसंगात मुंबईत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या बैठका होत आहेत. शरद पवार गटाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सध्या बैठक सुरू आहे.

NCP Meeting Live Updates :  

  • शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बैठकीला विधानसभेचे १३ आणि विधानपरिषदेचे ३ आमदार तसेच ५ खासदार उपस्थित आहेत. यामध्ये अनिल देशमुख, रोहित पवार, राजेंद्र शिंगणे, अशोक पवार, किरण लहमटे, प्राजक्ता तनपुरे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, चेतन विठ्ठल तुपे, जयंत पाटील, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर आणि देवेंद्र भुयार यांच्यासह शशिकांत शिंदे, बाबाजानी दुराणी, एकनाथ खडसे या आमदारांचा समावेश आहे. तर पाच खासदारांमध्ये श्रीनिवास पाटील (लोकसभा), सुप्रिया सुळे (लोकसभा), अमोल कोल्हे (लोकसभा), फौजिया खान (राज्यसभा) वंदना चव्हाण (राज्यसभा) यांचा समावेश आहे.

  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वाय.बी.चव्हाण सेंटर मध्ये दाखल

  • शरद पवार गटाचे नेते पक्षाच्या बैठकीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचताच कार्यकर्त्यांकडून समर्थनार्थ घोषणाबाजी.

Back to top button