रामनवमी 2023 : भोसला स्कूलमध्ये रांगोळीतून 'रामचरित्र' | पुढारी

रामनवमी 2023 : भोसला स्कूलमध्ये रांगोळीतून 'रामचरित्र'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला कॅम्पसमध्ये कोंदडधारी राम मंदिरात रामदंडी, एनसीसी पथकासह रायफल व अश्वपथकाने मानवंदना दिली. शाळेच्या परिसरात रामचरित्र व देशभक्तीपर रांगोळी रेखाटण्यात आली आहे.

संस्थेच्या नाशिक विभागाचे कार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे यांच्याहस्ते कोंदडधारी राममंदिरात महापूजा करण्यात आली.

उपस्थित भाविकांनी ‘सियांवर रामचंद्र की जय’ जयघोष केला. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगांवकर, नाशिक विभाग सहकार्यवाह नितीन गर्गे, खजिनदार शितल देशपांडे, प्रशांत नाईक, नरेंद्र वाणी, सुयोग शहा आदी उपस्थित होते. रामनवमीचे औचित्य साधत संस्थेच्या विविध युनिटमधील ४० हुन अधिक कलाशिक्षकांनी ९०० किलो रांगोळीचा वापर करत दिड दिवसांमध्ये संपूर्ण रांगोळी रेखाटली आहे.

या रांगाेळीमध्ये भोसला स्कुल परिसरातील कोंदडधारी राममुर्तीसह रामनाम चरित्राचा संदेश देणारी १०८ नावे काढण्यात आली आहेत. तसेच देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने संपूर्ण वंदे मातरम‌्चे रांगोळीमधून रेखाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी स्कुलचे रामदंडी, एनसीसी पथक, तसेच रायफल व अश्वपथकाने मानवंदना दिली. यावेळी रामरक्षा व गीतेमधील १५ व्या अध्ययनाचे पठण करण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button