ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा आणि कार्तिकी गोन्साल्विस यांनी पीएम मोदींची घेतली भेट | पुढारी

ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा आणि कार्तिकी गोन्साल्विस यांनी पीएम मोदींची घेतली भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्कर विजेता लघुपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्या गुनीत मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ऑस्कर २०२३ मध्ये हा सन्मान मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी दोघींचेही अभिनंदन केले.

या भेटीचा फोटो पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केला आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या यशाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे तसेच प्रशंसा केली आहे. आज, मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. भारतासाठी हा मोठा गौरव आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

तर ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉंगचा ऑस्कर मिळाला.

हेही वाचा : 

Back to top button