Radhika Apte: राधिका आपटेच्या 'मिसेस अंडरकव्हर' फिल्मचा ट्रेलर रिलीज, ‘या’ OTT वर करणार धमाल | पुढारी

Radhika Apte: राधिका आपटेच्या 'मिसेस अंडरकव्हर' फिल्मचा ट्रेलर रिलीज, ‘या’ OTT वर करणार धमाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) सध्या तिच्या आगामी ‘मिसेस अंडरकव्हर’ (mrs undercover) चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी गुरुवारी ‘मिसेस अंडरकव्हर’चा ट्रेलर रिलीज केला आहे, ज्यामध्ये राधिकाचा वेगळा अवतार पाहायला मिळत आहे.

ट्रेलरमध्ये राधिका (Radhika Apte) अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. ‘मिसेस अंडरकव्हर’मध्ये (mrs undercover) सुमीत व्यास आणि राजेश शर्मासारखे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शन अनुश्री मेहता यांचे असून तो 14 एप्रिल रोजी ओटेटी प्लॅटफॉर्म झी फाईव्हवर (ZEE5)वर रिलीज होईल.

‘मिसेस अंडरकव्हर’ (mrs undercover) ही दुर्गा नावाच्या एका साध्या भारतीय गृहिणीची कथा आहे, जिला 10 वर्षांनंतर पुन्हा कामावर बोलावले जाते. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये ती आपण एक गुप्त एजंट असल्याचे विसरली आहे. कारण तिने तिचा सर्व वेळ तिच्या कुटुंबाची काळजी घेण्यात घालवला आहे.

विशेष म्हणजे राधिकाचा (Radhika Apte) चित्रपट नेहमीच अप्रतिम आणि वेगळा असतो. वेगवेगळ्या विषयांवर काम करत असल्यामुळे राधिकाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वैयक्तिक आयुष्य असो की व्यावसायिक राधिका प्रसिद्धीच्या झोतात नेहमी असते.

Back to top button