Vinesh Phogat : जर माझी हत्या झाली तर… ‘गोल्डन गर्ल’ विनेश फोगाट | पुढारी

Vinesh Phogat : जर माझी हत्या झाली तर... 'गोल्डन गर्ल' विनेश फोगाट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था: विनेश फोगाटला भारताची ‘गोल्डन गर्ल’ विनेश फोगाटने ( Vinesh Phogat) एक धक्कादायक खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेल्यावर आपले कसे शोषण झाले आणि त्यामुळे मला रोज जीवन संपवावे असे वाटायचे, असे धक्कादायक वक्तव्य विनेशने केले आहे. यावेळी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नियमात नसतानाही ते खेळाडूंबरोबर हॉटेलमध्ये राहायचे, असेही विनेशने सर्वांसमोर सांगितले आहे.

Vinesh Phogat : जर माझी हत्या झाली तर

भारताचा तिरंगा घेऊन जे खेळाडू देशाची शान वाढवतात त्यांच्यावर आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. बृजभूषण सिंह यांनी केलेल्या अन्यायाबाबत त्यांनी आता दाद मागायचे ठरवले आहे. त्यासाठी बृजभूषण सिंह हॉटेलच्या रूममध्ये नेमके काय करायचे आणि त्यांनी आपले कसे शोषण केले, याबाबतची माहिती विनेशने आता दिली आहे.विनेशने सांगितले की, जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला जायचो. तेव्हा बजभूषण हे खेळाडूंच्याच हॉटेलमध्ये थांबायचे. ही नियमांच्या विरोधात आहे. बृजभूषण फक्त एवढेच करायचे नाहीत तर ते महिला खेळाडूंच्या मजल्यावरच आपली रूम बुक करायचे. त्यानंतर जाणूनबुजून ते आपल्या रूमचा दरवाजा उघडाच ठेवायचे. जेव्हा माझा टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पराभव झाला तेव्हा त्यांनी मला तुझे नाणे खोटे आहे, असे सांगितले होते. त्याचबरोबर माझा मानसिक छळही केला. त्यामुळे माझ्या मनात प्रत्येक दिवशी जीवन संपवावे असा विचार येत होता. माझी हत्यादेखील होऊ शकते. जर माझी हत्या झाली तर त्यासाठी बृजभूषण यांनाच जबाबदार धरावे.

भारतीय कुस्तीमध्ये सध्याच्या घडीला एकामागून एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. संघाच्या निवडीसाठी बरेच प्रशिक्षक आणि त्यांच्याबरोबर बृजभूषण सिंह हे शरीर सुखाची मागणी करत असल्याचे खेळाडूंनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विरोध करण्यासाठी आणि कुस्ती संघटनेत बदल घडवण्यासाठी आता जागतिक दर्जाचे कुस्तीपटू जंतरमंतर येथे आंदोलन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा

Back to top button