मुलगी झाली हो : शर्मिष्ठा राऊत १० वर्षांनी परतली , मालिकेत नवं वळण

मुलगी झाली हो : शर्मिष्ठा राऊत १० वर्षांनी परतली , मालिकेत नवं वळण

Published on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेचं कथानक अतिशय रंगतदार वळणावर आलं आहे. या मालिकेत शर्मिष्ठा राऊत या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. शर्मिष्ठा राऊत ही निलिमा सावंत ही व्यक्तिरेखा साकारत आहे. निलिमाच्या येण्याने मालिकेत नवं वळण आले आहे.

माऊने सिद्धांत सोबत लग्नासाठी नकार दिलाय. लग्न करेन तर शौनकशी असं ठामपणे सांगितलं आहे. माऊने जरी लग्नासाठी नकार दिला असला तरी सिद्धांत हार मानायला तयार नाही.

निलिमाचा वापर करुन तो माऊचे वडील म्हणजेच विलास पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.

सिद्धांत आणि निलिमाचा डाव यशस्वी होणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेलच. पण निलिमा सावंत या भूमिकेच्या निमित्ताने शर्मिष्ठाचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका मुलगी झाली हो रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news