Vidula Chougule : हाय कातील अदा, उफ् नशिली नजर 🔥😍; विदुलाचा जाळ धूर संगटच | पुढारी

Vidula Chougule : हाय कातील अदा, उफ् नशिली नजर 🔥😍; विदुलाचा जाळ धूर संगटच

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘जीव झाला येडा पिसा’ ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री विदुला चौगुले ( Vidula Chougule ) ही या मालिकेतून प्रकाश झोतात आली. तिच्या नवनवीन फोटोंनी सोशल मीडियावरील चाहत्यांना अक्षरश: वेडे केले आहे. तिच्या एकाहून एक फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पाडलाय.

अभिनेत्री विदुला चौगुले ( Vidula Chougule ) हिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही पारंपारिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यात तिने मोरपंखी कलरच्या सहावारी साडीसोबत ब्लॅक रंगाचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान करून चारचॉंद लावले आहेत. भिजलेल्या मोकळ्या केसांची स्टाईल, हातात अंगठी- बांगड्या, कानात इअररिंग्स, पायात धातूचे वाळे, गळ्यात बोरमाळ, नाकात नथ, रेड लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘your grace is a strength, डार्लिंग🔥❤️🥀’ असे लिहिले आहे. विदुला या फोटोत खूपच मनमोहक दिसत असून तिने चिरांच्या विटांनी बनलेल्या भिंतीजवळ उभारून फोटोला पोझ दिली आहे. याशिवाय या फोटोत विदुलाच्या आजूबाजूला सुंदर अशी हिरवी गार झाडी दिसतेय. याशिवाय विदुला आणखी एका फोटोत ब्लॅक रंगाच्या साडीतदेखील ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

विदुलाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘aye Haye ❤️’, ‘Sundar tai ❤️’, ‘So beautiful ❤️’, ‘💚💚💚wow’, ‘Uffff😍😍’, ‘Excellent 🙌’, ‘So cute 💕😊’, ‘Glamorous…, ,❤️😍❤️so cute honey❤️’, ‘🔥❤️mast, हाय कातील ती अदा…उफ नशिली ती नजर… 🔥😍’, ‘The beauty, grace, style and attitude just bang on… Perfect 😍😍❤️❤️’, ‘Kadak 🔥’, ‘जीव झाला अजुन डोक्यातून जात नाही👏😂’, ‘Ufffffffff 😍😍’, ‘जाळ 🔥🔥’, ‘Ohoooo 🔥🔥🔥’, ‘Ohoho… आखोंकी नमकीन मस्तियां!!🔥🧡’, ‘❤️Heartbreak look ❤️’, ‘नाद खुळा 👌👌❤️कडक मस्त विषय हार्ड 💓💓जबरदस्त 🔥🔥🔥🔥🔥🔥’, ‘Amazing🔥😍’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटऱ्यांनी हार्ट, फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास ५० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

विदुला चौगले सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर अनेक नवनवीन एकापेक्षा एक हॉट फोटोंचा भरणा पाहायला मिळतोय. छोट्या पडद्यावरील ‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेतून विदुलाने अभिनयाची छाप सोडली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule)

Back to top button